शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

अमरकंटकहून परतलेल्या दोघींचा स्वाईन फ्लूने मृत्यू ? नागरिकांमध्ये धास्ती, आरोग्य यंत्रणा सक्रिय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2017 19:53 IST

अमरकंटकच्या यात्रेहून परतलेल्या बडनेºयातील दोन महिलांचा गत पंधरवड्यात ‘स्वाईन फ्लू’ने मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून नागरिक धास्तावले आहेत. पंधरवड्यापूर्वी मरण पावलेल्या महिलेचा ‘स्वॅब’ पॉझिटिव्ह आल्याने स्वाईन फ्लूचे निदान झाले.

अमरावती - अमरकंटकच्या यात्रेहून परतलेल्या बडने-यातील दोन महिलांचा गत पंधरवड्यात ‘स्वाईन फ्लू’ने मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून नागरिक धास्तावले आहेत. पंधरवड्यापूर्वी मरण पावलेल्या महिलेचा ‘स्वॅब’ पॉझिटिव्ह आल्याने स्वाईन फ्लूचे निदान झाले. तर शुक्रवारी २९ सप्टेंबर रोजी स्वाईन फ्लू सदृश आजाराने दुस-याही महिलेचा मृत्यू झाला. मात्र, अद्याप तिच्या ‘स्वॅब’चा अहवाल आरोग्य प्रशासनाला प्राप्त झालेला नाही. मात्र, उपरोक्त दोन्ही महिलांचा मृत्यू स्वाईन फ्लूनेच झाल्याची परिसरात चर्चा आहे.बडनेरा जुन्या वस्तीतील कंपासपु-यातील रहिवासी जीजाबाई प्रदीप वाठ (६५) व सुशीला सदाशिव निमकर (६५) या दोन्ही महिला महिनाभरापूर्वी अमरकंटक येथे यात्रेसाठी गेल्या होत्या. त्यांच्यासोबत परिसरातील अन्य सहा महिला देखील होत्या. यात्रेहून परतल्यानंतर उपरोक्त दोघींना ताप आला. त्यानंतर हातपाय दुखणे, अंगावर सूज येणे ही लक्षणे दिसून आली. उपचारानंतरही तब्येतीत सुधारणा न झाल्याने दोघींनाही खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. स्वाईन फ्लूची लक्षणे दिसल्याने जीजाबाई वाठ यांचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याची पृष्ठी आरोग्य विभागाने केली आहे. दरम्यान उपचार सुरू असताना पंधरवड्यापूर्वी जीजाबार्इंचा मृत्यू झाला.समान लक्षणे सुशीला निमकर यांच्यामध्येही आढळल्याने त्यांच्यावर स्वाईन फ्लूचे उपचार सुरू होते. त्यांचा स्वॅब देखील तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. मात्र, त्याचा अहवाल येण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सुशीला निमकर व जीजाबाई वाठ यांच्यासह अमरकंटक यात्रेला गेलेल्या अन्य महिलांसह त्यांच्या कुटुंबियांनाही ‘टॅमीफ्लू’चे उपचार आरोग्य विभागाने सुरू केले आहेत. अन्य प्रांतातूनच स्वाईन फ्लूची परिसरात लागण झाल्याचा कयास आरोग्य विभागाने वर्तविला आहे. जीजाबाई वाठ यांचा स्वॅब ‘स्वाईन फ्लू’ पॉझिटिव्ह होता. तर सुशीला निमकर यांचा तपासणी अहवाल प्राप्त झालेला नाही. या गंभीर आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी यंत्रणा तैनात आहे.- वैशाली मोटघरे,वैद्यकीय अधिकारी, मोदी दवाखाना, बडनेरा