शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
3
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
4
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
5
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
6
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
7
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
8
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
9
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
10
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
11
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
12
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
13
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
14
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
15
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
16
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
17
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
18
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
19
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
20
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार

सीसीटीव्हीने गवसला वृद्धाला लुटणारा ठकबाज; राजापेठ पोलिसांचे यश

By प्रदीप भाकरे | Updated: April 9, 2023 14:59 IST

अडीच महिन्यानंतर उकल

प्रदीप भाकरे, अमरावती : एका ८२ वर्षीय वृद्धाच्या हातावर शस्त्राने घाव घालून त्यांच्या घरातून ११०० रुपये हिसकावून पळणाऱ्या आरोपीला जेरबंद करण्यात राजापेठ पोलिसांना रविवारी यश आले. विवेक विनायक राऊत (४८ वर्ष, रा. आष्टा, ता. धामणगाव रेल्वे) असे अटक आरोपीचे नाव आहे. केवळ सीसीटीव्ही फुटेजमुळे अडीच महिन्यानंतर या घटनेची उकल होऊ शकली.

गणेश कॉलनी येथील विजय श्यामसुंदर देवगावकर हे पत्नीसह घरी असताना २८ जानेवारी रोजी रात्री ९ च्या सुमारास एक अज्ञात आरोपी तोंडाला दुपट्टा बांधून, चष्मा घालून त्यांच्या घरात शिरला. त्याने विजय देवगावकर यांना तीन लाख रुपये मागितले. त्यांनी नकार दिला तेव्हा त्याने देवगावकर यांच्या डाव्या हातावर शस्त्राने वार करून त्यांना जखमी केले तथा तो जबरीने ११०० रुपये घेऊन तेथून पळून गेला. राजापेठ पोलिसांनी ३० जानेवारी रोजी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर परिसरात खबऱ्यांना सक्रिय केले. त्यावेळी काही संशयितसुद्धा पडताळण्यात आले. परंतु, गुन्ह्याचा कुठलाही सुगावा लागला नाही.

दरम्यान, रविवारी गोपनीय माहितीच्या आधारे शिताफीने सापळा रचून विवेक विनायक राऊत याला ताब्यात घेण्यात आले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.यांनी केली कारवाई

पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त विक्रम साळी व सहायक पोलीस आयुक्त भारत गायकवाड व पूनम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजापेठचे ठाणेदार मनीष ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक गजानन काठेवाडे, छोटेलाल यादव, सागर सरदार, नीलेश गुल्हाने, दिनेश भिसे, विकास गुळधे, नरेश मोहरील यांनी ही कारवाई केली. कुठलाच सुगावा नसताना केवळ पाठपुराव्याच्या बळावर राजापेठ पोलिसांना ही यशस्विता मिळाली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी