शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
6
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
7
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
8
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
9
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
10
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
11
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
12
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
13
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
14
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
15
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
16
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
17
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
18
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
19
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
20
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

उन्हाची झळ, दुधाची आवक घटली, मागणी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 22:32 IST

उन्हाळ्याच्या दिवसांत हिरव्या चाऱ्याचा अभाव, उष्णेचे वाढते प्रमाण यामुळे दुधाळू जनावरांना पोषक वातावरण मिळू शकत नाही. त्यामुळे दुधाची आवक कमी होते.

ठळक मुद्देमे महिन्यात आणखी घटणार आवक : सद्यस्थितीत साडेचार हजार लीटरचा पुरवठा

अमरावती : उन्हाळ्याच्या दिवसांत हिरव्या चाऱ्याचा अभाव, उष्णेचे वाढते प्रमाण यामुळे दुधाळू जनावरांना पोषक वातावरण मिळू शकत नाही. त्यामुळे दुधाची आवक कमी होते. मात्र सद्यस्थितीत दुग्ध विकास संस्थांकडून शासकीय दुग्ध विकास यंत्रणेला रोेज अंदाजे साडेचार हजार लीटर दुधाचा पुरवठा होत असला तरी मे महिन्यात बाहेरील खासगी डेऱ्यांची दुधाची मागणी वाढत असल्याने शासकीय दुग्ध विकास यंत्रणकडे आवक आपसुक घटण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.सद्यस्थितीत साडेचार ते पाच हजार लीटर दुधाची आवक आहे. परंतु, मे महिन्यात पाचशे लीटरने प्रतिदिन दुधाची घटण्याची शक्यता आहे. शासकीय दूग्ध विकास यंत्रणेकडे जरी दुधाची रोजची आवक साडेचार हजार लीटरची असली तरी ज्या काही नोंदणीकृत संस्था आहेत, त्यांचा जिल्ह्याला पुरवठा ४४ ते ४५ हजार लीटरचा होतो. जिल्हा संघाच्यावतीने साडेतीन हजार लीटर दुधाचा पुरवठा होेतो, तर तालुका संघाच्यावतीने १६०० ते १८०० लिटर दूधाचा पुरवठा शासकीय यंत्रणेला करण्यात येतो. या दुधावर पक्रिया होऊन पाकीटबंद शासकीय दूध विक्रीसाठी जाते.तीन रूपये अधिक भाव मिळत असल्याचा दावाखासगी डेअरीकडे दूध उत्पाक मोठ्या प्रमाणात दुधाची विक्री करताना दिसत आहे. कारण त्यांना शासकीय यंत्रणेपेक्षा दुधाचे दर चांगले मिळत आहे. पण या सिजनला दुधाची आवक चांगली आहे. त्या तुलनेत खासगी डेअरीचालकांना चांगला भाव मिळत नाही. खासगीपेक्षा तीन ते चार रूपयांनी शासकीय यंत्रणेकडे चांगला भाव मिळत असल्याने उन्हाळा असतानाही सद्यस्थित आवक चांगली आहे. ३.५ फॅट व ८.५ (एसएनएफ) सोलिड नॉट फॅटसाठी शासकीय २७ रूपये प्रतिलिटर दर मिळत आहेत. खासगीत २२ ते २४ रूपये लीटर, तर ६.० फॅट व ९.० एसएनएफसाठी शासकीय ३६ रूपये प्रतिलीटर, तर खासगीत ३२ ते ३३ रूपये दर मिळत असल्याची माहिती आहे.लस्सीसाठी दुधाची मागणी वाढलीअंबानगरीत अनेक परप्रांतीय व्यवसायिकांनी शीतपेय व लस्सीची दुकाने थाटली आहेत. लस्सी निर्मितीसाठी दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांकडून चढ्या दराने दूध विकत घेण्यात येत आहे. त्यामुळे पुढील महिन्यात शासकीय यंत्रणेकडे अचानक दुधाची आवक घटणार आहे. पण, त्याचा परिणाम जास्त दिवस जाणवणार नसल्याचे दुग्ध विकास यंत्रणेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.सद्दस्थितीत दुधाची आवक अशंत: कमी झाली. खासगी दूध विकत घेणाºयांपेक्षा तीन ते चार रूपयांनी नोंदणीकृत दूध पुरवठा करणाऱ्यां दुधाचे शासकीय भाव जास्त आहे.- संपत जांभुळे,जिल्हा दुग्ध विकास व्यवसाय अधिकारी, अमरावती