शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

बेपत्ता व्यावसायिकाचा संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 01:18 IST

बेपत्ता मेडिकल स्टोअर संचालकाचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आल्याने बुधवारी खळबळ उडाली. प्रफुल्ल पुरुषोत्तम कांबळे (३०, रा. मिर्चापूर, ता.तिवसा) असे मृताचे नाव आहे. ही घटना फे्रजरपुरा हद्दीतील मार्डी रोडवरील अच्युत महाराज रुग्णालयापासून काही अंतरावर घडली.

ठळक मुद्देमृतदेह फेकला ? : विष प्यायला की पाजले?, मार्डी मार्गावर घटना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बेपत्ता मेडिकल स्टोअर संचालकाचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आल्याने बुधवारी खळबळ उडाली. प्रफुल्ल पुरुषोत्तम कांबळे (३०, रा. मिर्चापूर, ता.तिवसा) असे मृताचे नाव आहे. ही घटना फे्रजरपुरा हद्दीतील मार्डी रोडवरील अच्युत महाराज रुग्णालयापासून काही अंतरावर घडली. शवविच्छेदन अहवालात प्रफुल्लचा मृत्यू विषाने झाल्याचे स्पष्ट असले तरी त्याने विष घेतले की पाजण्यात आले, याबाबत संशय आहे. याप्रकरणात पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.प्रफुल्ल कांबळे याचे कुºहा येथे माउली मेडिकल प्रतिष्ठान असून, वर्षभरापूर्वीच त्याचे लग्न झाले. तो ९ सप्टेंबर रोजी आईसोबत एका एमआर मित्राच्या एमएच २७ एयू २०४४ या मोपेडने बहिणीची प्रकृती पाहण्यासाठी राजापेठ स्थित डॉ. बोंडे हॉस्पिटलला गेला. तेथून रात्री १० वाजता बाहेर पडला आणि मोपेडने गावाकडे निघाला होता. मात्र, त्यानंतर तो बेपत्ता झाला. नातेवाइकांना त्याचा शोध लागला नाही. त्यामुळे राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. बुधवारी प्रफुल्लचा मृतदेह मार्डी रोडलगत आढळून आला. या माहितीवरून फे्रजरपुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यालगत प्रफुल्लचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने पोलिसांनी हत्येचा संशय व्यक्त केला. घटनास्थळी वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन केला. त्याची मोपेड झुडुपात आढळली. डिक्कीत सोन्याची चेन, काही पैसे व औषधी होत्या. यावरून त्याच्या हत्येचा कट आखल्याचा संशय व्यक्त होत आहे.विष पाजून हत्या झाल्याचा अंदाजइर्विन रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी कुंडे यांनी प्रफुल्ल कांबळे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले. प्राथमिक अहवाल फे्रजरपुरा पोलिसांच्या स्वाधीन केला. शरीरावर जखमा किंवा गळा आवळल्याचे निशाण नाही. त्यामुळे हा वेगळा काही प्रकार असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे....अन्यथा मृतदेह उचलणार नाहीप्रफुल्लची हत्याच झाल्याचा संशय नातेवाइकांनी व्यक्त केला. मारेकºयांचा शोध घेऊन त्यांना अटक करा, तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही, असा पवित्रा नातेवाइकांनी घेतला होता. त्यामुळे घटनास्थळी नातेवाइकांचा रोष दिसून आला.रस्त्यालगतच कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. विष पाजून हत्या केली आणि मृतदेह फेकला असावा, अशी शक्यता आहे. त्या अनुषंगाने तपास सुरू केला आहे.- आसाराम चोरमले, पोलीस निरीक्षक

टॅग्स :MurderखूनDeathमृत्यू