शहरं
Join us  
Trending Stories
1
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
2
"लेखनात काही चूक असल्यास..., नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित कराव्यात!"; संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांवर विश्वास पाटील स्पष्टच बोलले
3
आता कोणत्या देशावर हल्ला करणार अमेरिका?; ८०० सैन्य अधिकाऱ्यांची अचानक बैठक, चर्चांना उधाण
4
सर्जरी करताना ऑपरेशन थिएटरच्या छताचं प्लास्टर कोसळलं; डॉक्टरने शेअर केला शॉकिंग Video
5
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती -video
6
लाडक्या बहिणींना मिळणार १ लाखापर्यंत विशेष कर्ज; दीड हजारांच्या मानधनातून हप्ते वळते होणार
7
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीकडून 'ड्रामेबाज' पाकिस्तानी पंतप्रधानांची पोलखोल; कोण आहेत पेटल गहलोत?
8
Indian Idol 12 फेम सायली कांबळे लवकरच होणार आई, सोशल मीडियावर दिली खुशखबर!
9
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट
10
नवरात्री २०२५: अष्टमीला देवीसमोर घागरी फुंकण्याने अंगात संचार होतो? काय आहे ही प्रथा?
11
नवीन ट्रेंड्स फॉलो करणाऱ्यांनो सावधान! तुम्हीही ‘तो’ फोटो शेअर केला का ?; समोर आलं मोठं संकट
12
एक ओव्हर आणि मग गायब, फायनलपूर्वी हार्दिक पांड्याला झालं काय? टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
13
Corona Virus : बापरे! कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन; 'ही' लक्षणं दिसताच सावधान
14
अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?
15
नवरात्री २०२५: कोकणस्थांकडे अष्टमीला असते उकडीच्या मुखवट्याची महालक्ष्मी; काय आहे वैशिष्ट्य?
16
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांची 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
17
विना इनक्रिमेंट १ लाखांपेक्षा अधिक वाढली सॅलरी; रुपया आणि डॉलर्सचा काय आहे याच्याशी संबंध?
18
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
19
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
20
ऑक्टोबरमध्ये शुक्र-शनीची युती; काही राशींना वाट्याला 'राजयोग' तर काहींना 'कर्माचे भोग'

आरागिरणीचा परवाना निलंबित

By admin | Updated: February 11, 2017 00:03 IST

नियमबाह्य लाकूड साठवून ठेवणे, विनापरवानगी आरागिरणी भाड्याने देणे, वनतरतुदींचा भंग आदी कारणांमुळे गोपालनगर एमआयडीसीतील संजय इंडस्ट्रीज (आरागिरणी) महिनाभर बंद राहील.

संजय ‘सॉ-मिल’: ८ मार्चपर्यंत वनविभागाचा मनाई हुकूमअमरावती : नियमबाह्य लाकूड साठवून ठेवणे, विनापरवानगी आरागिरणी भाड्याने देणे, वनतरतुदींचा भंग आदी कारणांमुळे गोपालनगर एमआयडीसीतील संजय इंडस्ट्रीज (आरागिरणी) महिनाभर बंद राहील. ८ मार्चपर्यंत परवाना निलंबित करण्याचे आदेश सहायक वनसंरक्षकांनी काढले आहेत. उपवनसंरक्षक हेमंत मीणा यांच्या आदेशानुसार सहायक वनसंरक्षक राजेंद्र बोंडे यांनी गुरुवारी संजय ‘सॉ -मिल’च्या संचालकांची अवैध लाकडाच्या साठवणुकीप्रकरणी सुनावणी घेतली. या सुनावणीदरम्यान सॉ-मिलधारकांना बचावाची संधी देण्यात आली. वनाधिकाऱ्यांनी बचाव पक्षाचे म्हणणे ऐकून घेतले. मात्र, संजय सॉ-मिलचे संचालक आरोपांचे खंडन करू शकले नाहीत. परिणामी वनविभागाने वनगुन्ह्याचा भंग केल्याचा ठपका ठेवून सदर आरागिरणीची परवानगी महिनाभरासाठी निलंबित करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. एमआयडीसी परिसरातील संजय सॉ-मिलमध्ये नियमबाह्य लाकूड साठवून ठेवण्यात आल्याची गुप्त माहिती ३ फेब्रुवारी रोजी सहायक वनसंरक्षक राजेंद्र बोंडे यांच्यासह काही वनकर्मचाऱ्यांना मिळाली.तीन जणांविरुद्ध वन गुन्हे अमरावती : या माहितीच्या आधारे त्यांनी संजय सॉ मिल (परवाना क्र. ए- २४) चे निरीक्षण केले. निरीक्षणादरम्यान निम प्रजाती इमारती लाकडाचे एकूण २४ नग परिमाण ०.७९४ घनमीटर लाकूड आढळून आले. याइमारती लाकडाचे दस्तऐवज, वाहतूक परवाना अथवा लाकडावर निशाणी (हॅमर) नसल्याचे वनाधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे वनविभागाच्या चमुने हे लाकूड आणि आरागिरणीत उभे आरायंत्र आकार ३६ इंची एक नग व इलेक्ट्रीक मोटार जप्त केली होती. आरागिरणीे परवानाधारक विवेक बोराडे यांच्यासह तीन जणांविरूद्ध महाराष्ट्र वननियमावली २०१४ मधील तरतुदींचा भंग केल्याबाबत प्राथमिक गुन्हा नोंदविला आहे. गुन्हा रिपोर्ट क्रमांक २०/९ अन्वये ३ फेब्रुवारी रोजी वनगुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी ९ फेब्रुवारीला सुनावणी घेण्यात आली. सुनावणीअंती वनगुन्ह्यांचा भंग झाल्याचा ठपका ठेवण्यात आला. आता ही आरागिरणी महिनाभर बंद राहणार आहे.अवैध लाकू ड साठवून ठेवल्याप्रकरणी सुनावणी घेण्यात आली. बचावपक्षाचे म्हणने ऐकून घेतले. वनगुन्ह्यांचा भंग झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आता संजय सॉ-मिल महिनाभर बंद राहिल.- राजेंद्र बोंडेसहायक वनसंरक्षक, अमरावती.