शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय जीवावर बेतला; विचारणा करायला गेला अन खून झाला

By प्रदीप भाकरे | Updated: March 10, 2026 14:59 IST

Amravati : नैतिक संबंधाच्या संशयावरून एका तरुणाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना अमरावती शहरात उघडकीस आली आहे. अमरावती शहर गुन्हे शाखेने अत्यंत वेगाने तपास चक्रे फिरवत या खुनाचा छडा अवघ्या दोन तासांत लावला असून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

अमरावती: अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका तरुणाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना अमरावती शहरात उघडकीस आली आहे. अमरावती शहर गुन्हे शाखेने अत्यंत वेगाने तपास चक्रे फिरवत या खुनाचा छडा अवघ्या दोन तासांत लावला असून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

​आज मंगळवार दिनांक १० मार्च रोजी सकाळी, बडनेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रायसोनी कॉलेजसमोरील मसला गावाजवळ एका पुरुषाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली. घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान मृताची ओळख पटली असून, सूरज पुसुलाल यादव (वय ३१ वर्षे) असे त्याचे नाव आहे. तो मूळचा धानसोड (गोंदिया) येथील रहिवासी असून सध्या मसला, बडनेरा येथील विटाभट्टीवर कामगार म्हणून कार्यरत होता.

​गुन्हे शाखेने मृताच्या नातेवाईकांकडे आणि विटाभट्टीवरील इतर कामगारांकडे सखोल चौकशी केली. तपासात असे समोर आले की, मृताला त्याच्या पत्नीचे आरोपीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. याच कारणावरून काल रात्री ९ मार्च रोजी ९ ते १० च्या सुमारास मृत सूरज यादव आणि आरोपी अनिल शिव धुर्वे यांच्यात जोरदार भांडण झाले. हे भांडण विकोपाला गेल्याने संतापलेल्या अनिल धुर्वे याने सूरजला जमिनीवर पाडले आणि दगडाने ठेचून त्याची निर्घृण हत्या केली. पोलिसांनी संशयावरून अनिल धुर्वे (वय ३५ वर्षे, रा. मोहडोंगरी, मध्य प्रदेश) याला ताब्यात घेतले असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.​

English
हिंदी सारांश
Web Title : Suspicion of Wife's Affair Leads to Murder in Amravati

Web Summary : In Amravati, a man was murdered due to suspicions of his wife's affair. Police swiftly arrested the accused, Anil Dhurve, who confessed to the crime after a heated argument escalated into a fatal attack with a stone. The victim, Suraj Yadav, worked at a brick kiln.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती