शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल ११ महिन्यांनंतर सिद्धार्थ मनोहरेचे आत्मसमर्पण, डीएससीचा गैरवापर करून ९८ लाखांच्या अपहाराचे प्रकरण

By प्रदीप भाकरे | Updated: February 2, 2023 20:23 IST

कोतवाली पोलिसांनी २ मार्च २०२२ रोजी धारणी तालुक्यातील टिटंबा, घुटी, काकरमल या तीन ग्रामपंचायतींच्या फसवणुकीबाबत तीन तर बिजुधावडी, चौराकुंड व मांगिया या तीन ग्रामपंचायतींबाबत एक असे एकूण चार एफआयआर नोंदविले होते.

अमरावती : धारणी तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि सचिवांच्या डीएससीचा गैरवापर करून ९८ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी चार गुन्हे दाखल असलेल्या सिद्धार्थ मनोहरे याने न्यायालयाच्या आदेशान्वये आत्मसमर्पण केले. आर्थिक गुन्हे शाखेने ४ फेब्रुवारीपर्यंत त्याची पोलिस कोठडी मिळविली आहे.

कोतवाली पोलिसांनी २ मार्च २०२२ रोजी धारणी तालुक्यातील टिटंबा, घुटी, काकरमल या तीन ग्रामपंचायतींच्या फसवणुकीबाबत तीन तर बिजुधावडी, चौराकुंड व मांगिया या तीन ग्रामपंचायतींबाबत एक असे एकूण चार एफआयआर नोंदविले होते. त्यानुसार कंपनी संचालक अनिल पुंडलिकराव खडसे (रा. श्यामनगर, अमरावती) व सिद्धार्थ रमेश मनोहरे (रा. अंजनसिंगी, ता. धामणगाव रेल्वे) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. सहा ग्रामपंचायतींच्या खात्यातून दोन्ही आरोपींच्या खात्यात एकूण ६२ लाख ९ हजार ७३५ रुपये परस्परच वळती करण्यात आली होती. त्यानंतर त्या रकमेत वाढ झाली. आरोपींनी आपल्याला त्याच्या श्यामनगर स्थित कार्यालयात बोलावून घेऊन आमच्या डिजिटल साइन असलेला पेनड्राइव्ह ठेवून घेतला. त्यानंतर त्या डीएससीचा गैरवापर करून ग्रामपंचायतीच्या खात्यातून स्वत:च्या खात्यात रक्कम वळती केली, असे ग्रामसचिवांनी तक्रारीत म्हटले होते. न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्याने खडसे याने गतवर्षीच एप्रिलमध्ये आत्मसमर्पण केले होते, तर मनोहरे हा गुन्हा दाखल होण्यापूर्वीपासूनच फरार झाला होता.

दोषारोप पत्रही दाखल -मनोहरे हा फरार असताना त्याने मार्च २०२२ मध्येच स्थानिक न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, तो नाकारल्याने त्याने नागपूर खंडपीठाकडे धाव घेतली होती. दरम्यान, मनोहरे फरार दर्शवून आर्थिक गुन्हे शाखेने रेकॉर्डब्रेक वेळेत दोषारोप पत्र दाखल केले. मी नव्हे तर मनोहरे हाच त्या घोटाळ्याचा मास्टरमाईंड असल्याचा दावा खडसे याने केला होता. त्यामुळे मनोहरेच्या शोधासाठी पोलिसांनी जंगजंग पछाडले होते.

तिसऱ्या गुन्ह्यात पोलिस कोठडी -अटकपूर्व जामीन न देता उच्च न्यायालयाने सिद्धार्थ मनोहरे याला आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार त्याने १६ जानेवारी रोजी स्थानिक न्यायालयासमोर आत्मसमर्पण केले. १९ जानेवारी रोजी आर्थिक गुन्हे शाखेने त्याला अटक करून त्याची पोलिस कोठडी मिळविली. चारपैकी तिसऱ्या एफआयआरमध्ये तो ४ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत आहे. चौथ्या गुन्ह्यातदेेखील त्याचा पीसीआर मागितला जाणार आहे. तो सलग १२ दिवसांपासून पोलिस कोठडीत आहे. 

टॅग्स :AmravatiअमरावतीCorruptionभ्रष्टाचारPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी