सर्वोेच्च न्यायालयाचा नवनीत राणा यांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 08:45 AM2021-06-23T08:45:13+5:302021-06-23T08:45:26+5:30

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विनीत सरन आणि न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांच्या अवकाशकालीन खंडपीठाने राणा यांना हा दिलासा दिला.

Supreme Court reassures MP Navneet Rana pdc | सर्वोेच्च न्यायालयाचा नवनीत राणा यांना दिलासा

सर्वोेच्च न्यायालयाचा नवनीत राणा यांना दिलासा

Next

अमरावती  : अपक्ष खासदार नवनीत राणा यांना दिलासा देताना सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी जात प्रमाणपत्र रद्द ठरवण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली. २७ जुलै रोजी या प्रकरणी अंतिम सुनावणी होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विनीत सरन आणि न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांच्या अवकाशकालीन खंडपीठाने राणा यांना हा दिलासा दिला. अनुसूचित जातीसाठी राखीव अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा यांनी २०१९ मध्ये बाजी मारली. 

खासदार राणांनी ‘मोची’ या अनुसूचित जातीच्या प्रमाणपत्रावर निवडणूक लढविली होती. त्याला माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावर निकाल देताना खंडपीठाने त्यांचे जात व वैधता प्रमाणपत्र अवैध ठरवले होते. त्याला राणा यांनी आव्हान दिले आहे. 

Web Title: Supreme Court reassures MP Navneet Rana pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.