शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

राज्यघटनेला अभिप्रेत समाज निर्माण व्हावा, न्यायमूर्ती भूषण गवई यांचं प्रतिपादन

By गणेश वासनिक | Updated: February 23, 2025 21:48 IST

Justice Bhushan Gavai News: राज्यघटनेला अभिप्रेत असा समाज निर्माण व्हावा, तेव्हाच राष्ट्र उभारी घेईल, असा विश्वास सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी रविवारी येथे व्यक्त केला.

- गणेश वासनिक अमरावती - देशाची राज्यघटना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय समानतेवर आधारित आहे. जात, धर्म, वर्गभेद विसरून सर्वांना समान संधी मिळवून देण्याची ती हमी देते. प्रत्येक व्यक्तीला न्याय व मूलभूत हक्क हे राज्यघटनेमुळे अबाधित आहेत. त्यामुळे समाजातील विषमता नष्ट करण्यासाठी सामूहिक प्रयत्न झाले पाहिजे. राज्यघटनेला अभिप्रेत असा समाज निर्माण व्हावा, तेव्हाच राष्ट्र उभारी घेईल, असा विश्वास सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी रविवारी येथे व्यक्त केला.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ४१ व्या दीक्षान्त सोहळ्यात ते प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करीत होते. या साेहळ्याच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन होते. यावेळी मंचावर राज्यपालांचे सचिव आयएएस प्रशांत नारनवरे, कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी आदी उपस्थित होते.

दीक्षान्त सोहळ्यात सुवर्ण पदक, पदवी, आचार्य पदवी, पारितोषिक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करताना न्यायमूर्ती गवई म्हणाले, तुमचा प्रवास इथे संपला नाही, तो आता सुरू झाला आहे. निरोगी शरीर आणि निकोप मन निर्माण करा. तुमच्या कर्तृत्वाने तुमच्या कुटुंबाचे, विद्यालयाचे, तुमच्या गावाचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी अशा लोकोत्तर महापुरुषांच्या विचारांनी प्रेरित होऊन एक जबाबदार नागरिक बना. स्वतःला घडवा. देश आणि समाज नव्याने निर्माण करा, असे आवाहन त्यांनी तरुणाईला केले. गाडगेबाबांचा आशीर्वाद दादासाहेब गवईंनाही मिळालासंत गाडगेबाबा हे कोणत्याही शाळा, महाविद्यालयात गेले नाहीत. पण, निरक्षर असलेल्या या माणसाचे नाव अमरावती विद्यापीठाला देण्यात आले, ही देशातील पहिली घटना असावी, असे न्यायमूर्ती भूषण गवई म्हणाले. गाडगेबाबांचा जीवनसंघर्ष, समर्पण आणि समतेवरील विश्वास आजही प्रेरणादायी आहे. माझ्यासाठी अभिमानाची बाब म्हणजे गाडगेबाबांचा सहवास आणि आशीर्वाद माझे वडील रा.सू. उपाख्य दादासाहेब गवईंना मिळालेला आहे. माझे वडील विद्यार्थीदशेत असताना गाडगेबाबा त्यांना प्रवचनाला घेऊन जायचे व त्यांना बाबा प्रवचनाच्या अगोदर भाषण करायला सांगायचे. खरे पाहता माझ्या वडिलांच्या सामाजिक व राजकीय कारकिर्दीच्या पायाभरणीत गाडगेबाबांचे अतिशय मोलाचे योगदान आहे, असे न्यायमूर्ती गवई म्हणाले.

टॅग्स :Amravatiअमरावती