शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

उन्हाळ्यात पशुपक्ष्यांच्या घशाला कोरड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 22:08 IST

घरातील पाळीव प्राण्यांसह पक्ष्यांना वाढत्या उष्णतेच्या झळा पोहोचताहेत. अशावेळी उष्माघाताने त्यांचा बळी जाण्याची भीती असते. मुक्या जीवांच्या मदतीसाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलण्याची आज खरी गरज आहे.

ठळक मुद्देनैसर्गिक पाणवठे आटले : शरीरातील पाणी कमी झाल्याने आरोग्याला धोका

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : घरातील पाळीव प्राण्यांसह पक्ष्यांना वाढत्या उष्णतेच्या झळा पोहोचताहेत. अशावेळी उष्माघाताने त्यांचा बळी जाण्याची भीती असते. मुक्या जीवांच्या मदतीसाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलण्याची आज खरी गरज आहे.यंदा होळीपूर्वीच उन्हाचा पारा वाढला. हा पारा चाळिशीला टेकला आहे. त्यामुळे नागरिकांना चांगलाच घाम फुटत आहे. पाळीव प्राणी, पक्षी, वा अन्य वनचर प्राण्यांवर हवामानातील बदलाचा परिणाम होतोे.पाळीव प्राण्यांच्या शरीराचे तापमान मानवी तापमानापेक्षा अधिक असल्याने कडक उन्हाळ्यात त्यांना अनेक शारीरिक व्याधी उद्भवतात. शहरातील पशुपक्ष्यांनाही उन्हाचा फटका बसत आहे. उष्णतेमुळे प्राण्यांना डिहायड्रेशन होते. शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे ते आजारी पडतात. विविध उन्हाळी सांसर्गिक आजार जडतात. अशा प्राण्यांवर वेळीच उपचार केले जातात. मात्र, प्राण्यांना उन्हाच्या त्रासापासून वाचविणे अवघड झाले आहे. डिहायड्रेशनबरोबरच पचनसंस्थेचे आजार, विविध प्रकारच्या जखमा, डोळ्यांचे विकार, स्वसन संस्थेचे आजार पशुपक्ष्यांना होतात. इतर वेळी शहरात उपलब्ध पाणी साठ्यावर पशुपक्षी तहान भागवतात. शारीरिक थंडावादेखील शोधतात. मात्र, शहरातून वाहणाऱ्या नदी-नाल्यांचे पाणी पातळी घटत चालली आहेत. आणि नैसर्गिक पाणवठे आटले आहेत. पाण्याच्या शोधार्थ पक्षी विहार करताना दिसतात. सिमेंटच्या जंगलात झाडांची संख्या कमालीची कमी झाली आहे. त्यातच नुकतीच पानगळ झालेली झाडे उघडी बोडकी दिसतात. त्यामुळे पुरेशी सावलीही पशुपक्ष्यांना मिळत नाही. सिमेंट डांबरी रस्त्यामुळे उन्हाचे चटके अधिक जाणवतात. त्याचा सर्वाधिक त्रास पशू-पक्ष्यांना होत आहे. त्यामुळे शहर व ग्रामीण भागातही घर व परिसरात पशुपक्ष्यांसाठी पाणवठे, कृत्रिम घरट्यांची सोय करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. सोशल मीडियावरही याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती होत असल्याचे पहायला मिळत आहे.जलपात्र लागावे ठिकठिकाणीकितीही उन्हाळा असला तरी मनुष्य स्वत:साठी पाण्याची सोय करू न घेतो. प्राणीही मिळेल तिथे पाणी पितात. परंतु पक्ष्यांना पाणवठे कोरडे पडल्यानंतर पाण्यासाठी इतरत्र भटकंती करावी लागते. त्यासाठी नागरिकांनी मानवी दृष्टिकोनातून पक्ष्यांनाही पाणी व निवाºयांचा आसरा देण्यासाठी जलपात्र व घरटी सावलीच्यआ ठिकाणी बसविण्यास पुढाकार घ्यावा, असे आवाहन पक्षिप्रमींकडून करण्यात येत आहे. शहरात वनमाला सामाजिक संघटनेसह इतरही संघटनांनी जलपात्र लावून पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. त्याचा हा स्तुत्य उपक्रम जिल्हाभर राबविण्याची आज आवश्यकता आहे.पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात पक्ष्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग असतो. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत जंगलात पाण्याचे स्त्रोत आटतात. त्यांची चारा-पाण्याची सुविधा नागरिकांनी करणे गरजेचे आहे.- नीलेश कंचनपुरे,पक्षिप्रेमी, अमरावती