फोटो पी १० येवदा
काशीबाई अग्रवाल विद्यालयात संताजी जगनाडे जयंती
येवदा : येथील काशीबाई अग्रवाल विद्यालय व कै. भा. य. उपाख्य भाऊसाहेब देशमुख उच्च माध्यमिक विद्यालयात जगनाडे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले. यावेळी संस्थेचे संचालक मनोज देशमुख, पर्यवेक्षक प्रदीप लांडे, मो.अथर, विकास देशमुख, सुनील तायडे, राजेंद्र कावळे, अनुपमा देशमुख, नीता देशमुख, उषा डोंगरदिवे, सुषमा देशमुख, ज्योती बंडगर, सविता बोदडे, ममता राजगुरू, लिला खंडेलवाल प्रामुख्याने उपस्थित होते. किशोर थोटे यांनी संचालन केले
-------------
नेरपिंगळाई येथे संत संताजी जगनाडे महाराज जयंती
नेरपिंगळाई : येथील जय संताजी बहुउद्देशीय तैलिक संघटनांच्यावतीने श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती उत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला सूरज अवचार, बापूराव खोडे, प्रकाश आंबेकर, विजय कपिले, स्वाती बाखडे, सुनंदा तांदळे, ऋषिकेश थोटांगे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी दिनदर्शिकांचे वाटप करण्यात आले. संचालन आशिष सापधारे व आभार हर्षल डिवरे यांनी मानले.
------------------------
जिल्हा परिषद शाळेत संताजी महाराज जयंती
नेरपिंगळाई : जय संताजी तैलिक बहुउद्देशीय संघटनेच्यावतीने ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद कन्या शाळा, जिल्हा परिषद मुलांची शाळा, जनता विद्यालय तसेच शिरखेड पोलीस स्टेशन येथे संताजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता जय संताजी तैलिक बहुउद्देशीय संघटना, जय संताजी महिला तैलिक संघटना, जय संताजी युवा तैलिक संघटना यांनी योगदान दिले.
-------------
फोटो पी १० दहातोंडे
शैलेंद्र दहातोंडे यांना शिक्षकरत्न
भातकुली : तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळा अळणगाव येथील विषय शिक्षक शैलेंद्र दहातोंडे यांना शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर झाला. ''मदत'' संस्थेद्वारे दरवर्षी शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. पुरस्काराचे वितरण २० डिसेंबर रोजी गुरुदेव सेवाश्रम, आग्याराम मंदिरजवळ नागपूर येथे होईल.
-------
शहरात कलम ३७ (१) लागू
अमरावती : शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस उपायुक्त (अमरावती शहर) यांनी महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. पोलीस आयुक्तयालय परिक्षेत्रात ८ ते २२ डिसेंबरपर्यंत लागू करण्यात आला आहे. या कलमांचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही पोलीस उपायुक्तांनी सांगितले.