सारांश बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:12 AM2021-04-24T04:12:30+5:302021-04-24T04:12:30+5:30

चांदूर रेल्वे : तालुक्यातील टेंभुर्णी येथील एक १७ वर्षीय मुलगा घरातून बेपत्ता झाला. २० एप्रिल रोजी रात्री १२.३० ते ...

Summary news | सारांश बातम्या

सारांश बातम्या

Next

चांदूर रेल्वे : तालुक्यातील टेंभुर्णी येथील एक १७ वर्षीय मुलगा घरातून बेपत्ता झाला. २० एप्रिल रोजी रात्री १२.३० ते १.३० च्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी चांदूररेल्वे पोलिसांनी २१ एप्रिल रोजी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला.

------------

वाढोणा येथे विनयभंग, मारहाण

तळेगाव दशासर : वाढोणा येथील एका ४० वर्षीय महिलेचा विनयभंग करण्यात आला व तिच्या कुटुंबीयांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी तळेगाव दशासर पोलिसांनी आरोपी विकास गुडधे, भूषण गुडधे, प्रभाकर गुडधे, प्रकाश गुडधेविरुद्ध गुन्हा दाखल केला. २१ एप्रिल रोजी ही घटना घडली.

--------------

वाढोणा येथे मुलाला मारहाण

तळेगाव दशासर : डोळे वटारणाऱ्यास विचारणा केली असता, उलटपक्षी त्यानेच एका मुलाला मारहाण केली. २१ एप्रिल रोजी पहाटे वाढोणा येथे ही घटना घडली. याप्रकरणी तळेगाव दशासर पोलिसांनी आरोपी प्रवीण जुनघरे, भास्कर जुनघरे व एका महिलेविरूद्ध गुन्हा दाखल केला.

-----------

चिंचोली येथे इसमाला मारहाण

धामणगाव रेल्वे : तालुक्यातील चिंचोली येथे शंकर बमनोटे ५५) यांना मारहाण करण्यात आली. २० एप्रिल रोजी रात्री ही घटना घडली. रात्रीचे घरात काम करू नका, या कारणावरून हा वाद झाला. मंगरुळ दस्तगीर पोलिसांनी याप्रकरणी राजेश गेडमे व प्रकाश गेडमे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला.

--------------

डेहणी येथून २.६२ लाखांचे सोने लंपास

तिवसा : तालुक्यातील डेहणी येथील राजेंद्र हिमाने (५८) यांच्या घरातून २ लाख ६२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व १० हजार रुपये रोख लांबविली. २० एप्रिल रोजी रात्री ही घटना घडली. तिवसा पोलिसांनी हिमाने यांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरूद्ध गुन्हा नोंदविला. सोन्याची पोत, गोफ, डोरले, अंगठी असा ऐवज चोरून नेला.

-----------

हिवरखेड येथे कुटुंबाला मारहाण

मोर्शी : तालुक्यातील हिवरखेड येथे एका ५० वर्षीय महिलेसह त्यांच्या पती व मुलीला मारहाण करण्यात आली. ठाण्यात तक्रार का दिली, अशी विचारणा करीत २० एप्रिल रोजी ही घटना घडली. याप्रकरणी मोर्शी पोलिसांनी कंगारू गुरू पदनाम, उमेश गुरू पदनाम व एका महिलेविरूद्ध गुन्हा दाखल केला.

----------------

त्याप्रकरणी गुन्हा दाखल

वरूड : तालुक्यातील देऊतवाडा रेतीघाटावर तलाठ्यासह चौघांविरुद्ध प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी वरूड पोलिसांनी सहा प्रमुख आरोपींसह अन्य ५ ते सहा जणांविरूद्ध कलम ३०७, ३५३, ३३२, १४३, १४७, १४८, १४९, ४२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. २१ एप्रिल रोजी पहाटे ही घटना घडली. यात दुचाकीचीदेखील तोडफोड करण्यात आली.

-----------------

सांगळूद येथील गोडाऊन फोडले

येवदा : दर्यापूर तालुक्यातील सांगळूद येथील गजानन गावंडे (६३) यांच्या गोडाऊनमधून १० हजार रुपये किमतीची तूर लंपास करण्यात आली. २१ एप्रिल रोजी ही घटना घडली. याप्रकरणी येवदा पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला.

---------------

नदीच्या पात्रातून ट्रक पकडला

भातकुली : तालुक्यातील खोलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नावेड गावालगतच्या नदीपात्रातून एमएच १४ एफ ८५८७ क्रमांकाचा रेतीने भरलेला ट्रक जप्त करण्यात आला. २१ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. खोलापूर पोलिसांनी याप्रकरणी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

--------------

गौरखेडा येथे महिलेला मारहाण

नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील गौरखेडा येथे एका ३५ वर्षीय महिलेला मारहाण करण्यात आली. तथा तिच्या पतीशी वाद घालण्यात आला. २१ एप्रिल रोजी सायंकाळी ही घटना घडली. याप्रकरणी नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी आरोपी रामदास भुरे, रिना भुरे, नकुल भुरे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला.

----------------

मुगलाईपुऱ्यातून दुचाकी लांबविली

परतवाडा : येथील मुगलाईपुराचे रहिवासी प्रतीक चौधरी (२७) यांच्या घरासमोरून त्यांची एमएच २७ सीई ५४४६ या क्रमांकाची दुचाकी लंपास करण्यात आली. १२ एप्रिल रोजी पहाटे ही घटना घडली. याप्रकरणी परतवाडा पोलिसांनी २१ एप्रिल रोजी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला.

------------------------

मांडवा येथे तरुणाला मारहाण

धारणी : तालुक्यातील मांडवा येथे राम दहिकर (२४, रा. उतावली) याला मारहाण करण्यात आली. अकारण हा वाद झाला. २१ एप्रिल रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी धारणी पोलिसांनी दोघांविरूद्ध गुन्हा दाखल केला. दहिकर हा त्याच्या मित्रासोबत मांडवा येथे गेला असता ही घटना घडली.

--------------------

फोटो पी २३ महापालिका

चपराशीपुऱ्यात कोविड तपासणी, दंडही

अमरावती : चपरासीपुरा परिसरात कोविड-१९ च्या अनुषंगाने विनाकारण शहरात फिरत असलेल्या ३८ नागरिकांची रेपिड टेस्ट करण्यात आली. तसेच दोन नागरिकांना मास्क नसल्याने ५०० रुपयांप्रमाणे दंड वसूल करण्यात आला. सदर ठिकाणी सहायक क्षेत्रीय अधिकारी देवरणकर, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक कुंदन हडाले, सर्व स्वास्थ्य निरीक्षक, पोलीस कर्मचारी व शिक्षक बेलकर, वसुली लिपिक व झोन कर्मचारी उपस्थित होते.

------------

सबनिस प्लॉट येथील दवाखान्यात लसीकरण केंद्र सुरू करा

अमरावती : सबनिस प्लॉट येथील महापालिकेच्या दवाखान्यात कोविड लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी बसपा गटनेता चेतन पवार यांनी आयुक्त प्रशांत रोडे यांच्याकडे केली. या परिसरात कल्याण नगर, मोतीनगर, कंवरनगर, सबनिस प्लॉट, छाबडा प्लॉट, वर्षा कॉलनी, सुभाष कॉलनी, सिंधूनगर, बापू कॉलनी, राजापेठ, केडिया नगर, विवेकानंद कॉलनी, कृषक कॉलनी, शिक्षक कॉलनी, मुदलियार नगर, इत्यादी परिसर येतो. त्या दृष्टिकोनातून पवार यांनी मागणी केली आहे.

-----------------

युवकांनी रोजगाराच्या फसव्या जाहिरातींना बळी पडू नये

अमरावती : आदिवासी विकास विभागार्माफत युवकांना रोजगार देण्याबाबत कोणत्याही प्रकारची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली नसून, युवकांनी फसव्या जाहिरातींना व आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त विनोद पाटील यांनी केले. पी.बी. गावंडे नावाचे व्यक्ती स्वत:ला ह्या विभागाचे सहायक आयुक्त सांगून बेरोजगार उमेदवारांची फसवणूक करीत असल्याचे विभागाचे निदर्शनास आले आहे.

-------------

Web Title: Summary news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.