सारांश बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:16 AM2021-08-21T04:16:42+5:302021-08-21T04:16:42+5:30

अमरावती: फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुदर्शन कॉलनी येथे एका महिलेच्या घरी दाराचे कुलूप फोडून चोरी करण्यात आली. त्या मुलासह ...

Summary news | सारांश बातम्या

सारांश बातम्या

Next

अमरावती: फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुदर्शन कॉलनी येथे एका महिलेच्या घरी दाराचे कुलूप फोडून चोरी करण्यात आली. त्या मुलासह गजानन नगर येथील भाच्याची प्रकृती पाहण्यासाठी १८ ऑगस्ट रोजी गेल्या होत्या. चोरट्यांनी लॉकरमधून पाच ग्रॅम अंगठी, रोख ९५०० असा २४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.///////////////

नांदेड येथे विवाहितेचा छळ

बडनेरा : नांदेड येथे सासरी पतीसह पाच जणांनी हुंडा व इतर कारणांसाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याची तक्रार बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माहेर असलेल्या विवाहितेने नोंदविली आहे. याप्रकरणी लिंबगाव, तालुका नांदेड येथील दीपक गोपीनाथ वागरे, गोपीनाथ महादू वागरे, विशाल गोपीनाथ वागरे व दोन महिलांविरुद्ध बडनेरा पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

////////////////

भातकुली येथून दुचाकी लंपास

भातकुली : येथील विजय वरखेडे (२७, इंदिरानगर) यांच्या घरापुढे त्यांच्या मामाने एमएच २७ बीएच २२०८ क्रमांकाची दुचाकी ठेवली होती. १८ ऑगस्ट रोजी रात्री ती लंपास करण्यात आली. याप्रकरणी भातकुली पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

////////////////

सिंधी चौक येथून दुचाकी लंपास

अमरावती : गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंधी चौक येथील राम संकुलापुढून एमएच २७ डब्ल्यू १५५७ क्रमांकाची दुचाकी लंपास करण्यात आली. अजय गिरे यांनी ही दुचाकी घरापुढे १४ ऑगस्ट रोजी उभी केली होती. गाडगेनगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

Web Title: Summary news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.