सारांश वृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:09 AM2021-07-09T04:09:43+5:302021-07-09T04:09:43+5:30

परतवाडा : स्थानिक पोलीस ठाण्याच्य हद्दीतील १६ वर्षीय मुलीला फुस लावून पळवून नेल्याची घटना ५ जून रोजी घडली. तक्रारीवरून ...

Summary news | सारांश वृत्त

सारांश वृत्त

Next

परतवाडा : स्थानिक पोलीस ठाण्याच्य हद्दीतील १६ वर्षीय मुलीला फुस लावून पळवून नेल्याची घटना ५ जून रोजी घडली. तक्रारीवरून ६ जुलै रोजी परतवाडा पोलिसांनी ऋषीकेश बाबूराव मोहोड (२१, रा. कांडली) विरुद्ध गुन्हा नोंदविला.

------------------

पोलिसांत तक्रार दिल्यावरून युवकाला मारहाण

परतवाडा : जुन्या वादातून पोलिसांत तक्रार दिल्याच्या कारणावरून युवकाला मारहाण केल्याची घटना ५ जुलै रोजी धोतरखेडा येथे घडली. सदाशिव रंगराव राऊत (३८) यांच्या तक्रारीवरून परतवाडा पोलिसांनी आरोपी विनायक पटारे (६०), दिनू राजणे (२५) रामपाल कस्तुरे (२६) व एकाविरुद्ध गुन्हा नोंदविला.

-----------------------

विवाहितेला माहेरहून ५० हजार रुपयांसाठी तगादा

अचलपूर : माहेरहून ५० हजार रुपये आणण्याचा तगादा लावून सासरच्या मंडळींनी शारीरिक व मानसिक छळ केल्याची घटना जीवनपुरा भागात ६ जुलैला घडली. तक्रारीवरून अचलपूर पोलिसांनी दीपक मनोहर चोपडे अधिक सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला.

--------------------

क्षुल्लक कारणावरून विळ्याने मारले

चांदूर बाजार : सायकल रस्त्याच्या बाजूला घे, असे म्हटल्यावरून वाद होऊन युवकावर विळ्याने मारून जखमी करण्यात आले. ही घटना जवळा शहापूर येथे ६ जुलैला घडली. चंदू गोकुल वानखडे यांच्या तक्रारीवरून मेशराव इंगोले (रा. जवळा शहापूर) विरुद्ध चांदूर बाजार पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

--------------------

लग्नात हुंडा न दिल्याने विवाहितेचा छळ

तिवसा : लग्नात हुंडा मिळाला नसल्याच्या कारणावरून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. तक्रारीवरून तिवसा पोलिसांनी अंकुश सुधाकर चौधरी व तीन जण (रा. मोर्शी) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.

-------------------

मजुरीचे पैसे घरात न दिल्याने मारहाण

नांदगाव पेठ : मजुरीचे पैसे घरात का देत नाही, यावरून वाद होऊन युवकाने भाच्याला मारहाण केल्याची घटना माहुली जहागिर येथे घडली. अ. रहमान मो. शफीर यांच्या तक्रारीवरून माहुली जहागीर पोलिसांनी मुस्तकीम करामत खान, मो. राजिक मो. इशाक, मो. इरशाक मो. इशाक, मो. रेहान विरुद्ध गुन्हा नोंदविला.

----------------------

त्रासापायी इसमाची आत्महत्या

येवदा : वडनेर गंगाई येथील केशवराव शालिकराम नागोसे यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या खिशात आढळलेल्या चिठ्ठीत दोन व्यक्तींचा त्रास असल्याने आत्महत्या करीत असल्याचे नमूद असल्याची तक्रार त्यांचा मुलगा हरीश नागोसे याने येवदा पोलिसांत दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

-------------------

भरधाव वाहन दुभाजकावर आदळून एक ठार

तिवसा : भरधाव वाहन दुभाजकावर धडकल्याने दोघे गंभीर जखमी झाले. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला, तर एक गंभीर आहे. ही घटना मोझरीनजीक दास टेकडीवर २ जुलै रोजी घडली. हर्षल दिवाकर खेडकर (रा. शेंदोळा) याच्या तक्रारीवरून तिवसा पोलिसांनी जगदीश रमेश बोरखडे (रा. शिवणगाव) विरुद्ध गुन्हा नोंदविला.

-------------------

अल्पवयीन मुलगी बेपत्ता

तळेगाव दशासर : आई-वडील शेतात कामाला गेले असता, १५ वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची घटना उसळगव्हाण येथे ५ जुलै रोजी उघडकीस आली. तक्रारीवरून तळेगाव पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून, मुलीचा शोध सुरू आहे.

----------------------

गुप्ती दाखवून लुटण्याचा प्रयत्न

वरूड : चोरीच्या उद्देशाने गुप्ती दाखवून बारमालकावर दोघांनी हल्ला केल्याची घटना इसंब्री रोडवरील एका बारमध्ये ६ जुलै रोजी घडली. रोशन अशोक दारोकार (३०, रा. जरुड) याच्या तक्रारीवरून वरूड पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदविला.

----------------------

भरधाव पिकअप वाहनाची ऑटोला धडक

खोलापूर : धामोरी ते बदलापूर मार्गावर भरधाव पिकअप वाहनाने ऑटोरिक्षाला धडक दिली. यात चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना ६ जुलै रोजी घडली. अनिस अली असगर अली यांच्या तक्रारीवरून खोलापूर पोलिसांनी अज्ञात पिकअप वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला.

----------------

Web Title: Summary news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.