सारांश बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:20 AM2021-05-05T04:20:53+5:302021-05-05T04:20:53+5:30

बेलखेडा शिवारातून दुचाकी लंपास चांदूर बाजार : तालुक्यातील बेलखेडा शिवारातून एमएच २७ एटी २०१८ क्रमांकाची दुचाकी चोरीला गेली. ...

Summary news | सारांश बातम्या

सारांश बातम्या

googlenewsNext

बेलखेडा शिवारातून दुचाकी लंपास

चांदूर बाजार : तालुक्यातील बेलखेडा शिवारातून एमएच २७ एटी २०१८ क्रमांकाची दुचाकी चोरीला गेली. १७ एप्रिल रोजी ही घटना घडली. याप्रकरणी डॉ. संजय खाडे (६२, रा. घाटलाडकी) यांच्या तक्रारीवरून ब्राम्हणवाडा थडी पोलिसांनी २ मे रोजी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.

--------------

चंदन चोरीप्रकरणी अज्ञात चौघांविरुद्ध गुन्हा

परतवाडा : येथील बॅप्टिस्ट चर्च परिसरातून तीन चंदनाची झाडे चोरून नेल्याप्रकरणी २ मे रोजी दुपारी परतवाडा पोलिसांनी अज्ञात चौघांविरुद्ध भादंविचे कलम ३७९, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. ३० एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी सलमान राक्षसकर (४७, परतवाडा) यांनी तक्रार नोंदविली.

------------

गुजरी बाजारातून दुचाकी लंपास

परतवाडा : येथील गुजरी बाजार परिसरातील बँकेजवळून एमएच २७ एबी ६४४९ क्रमांकाची दुचाकी चोरीला गेली. २२ एप्रिल रोजी ही घटना घडली. याप्रकरणी रवींद्र भिसे (४८, रा. एकलासपूर) यांच्या तक्रारीवरून परतवाडा पोलिसांनी २ मे रोजी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.

--------------

चांदुरातील नेताजी चौकातून दुचाकी लंपास

चांदूर बाजार : शहरातील नेताजी चौक भागातील एका घरापुढे उभी केलेली एमएच २७ बीएन ३३९० या क्रमांकाची दुचाकी चोरीला गेली. १ मे रोजी दुपारी ३ च्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी प्रफुल नावंदर (रा. भक्तिधाम परिसर) यांच्या तक्रारीवरून चांदूर बाजार पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.

---------------

नांदगावात तरुणास बेदम मारहाण

नांदगाव खंडेश्वर : येथील वाॅर्ड क्रमांक ५ मध्ये तेथेच राहणारा सतीश घाले (२१) याला लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आली. २ मे रोजी दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी आरोपी अनिल ज्ञानेश्वर घोडे (३२) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

---------------

अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण ठार

अमरावती : अज्ञात वाहनाच्या धडकेत रूपेश गणपतराव वाघाळे (२९, रा. येरला, ता. नरखेड) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. १ मे रोजी सकाळी १० वाजता माहुली ते डवरगाव रोडवर हा अपघात घडला. रूपेश हा माहुलीवरून येरला गावाकडे जात असताना अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक दिली.

--------

विदर्भवाद्यांनी पाळला काळा दिवस

अमरावती : राज्यकर्ते स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीची दखल घेत नसल्याच्या पार्श्वभूमीवर १ मे रोजी काळा दिवस पाळण्यात येऊन काळ्या फिती लावण्यात आल्या. घरावर झेंडे फडकविण्यात आले. रंजना मामर्डे, राजेंद्र आगरकर, दिलीप भोयर, सतीश प्रेमलवार, माधवराव गावंडे, विजय कुबडे, रियाज खान, अशोक हांडे, बाबाराव जाधव, दीपक कथे, सुनील साबळे, दिगंबर चुनडे, प्रकाश लद्धा, नंदकुमार देशमुख यांनी आंदोलनात सहभाग घेतला.

-----------------

पर्यायी रस्ता वापरण्याचे आवाहन

अमरावती : शहरातील दोन रस्त्यांचे काँक्रीटीकरण सुरु असल्याने नागरिकांनी पर्यायी रस्ता वापरण्याचे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे. न्यू कॉटन मार्केट सहकारनगर चौक ते पाठ्यपुस्तकालयापर्यंत रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम प्रगतीत असून, या रस्त्याची डावी बाजू १५ जूनपर्यंत बंद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, असोरिया पंप ते आमदार सुलभा खोडके यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उजव्या बाजूच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे उजवी बाजू वाहतुकीस बंद राहील. रस्त्यांची सुधारणा होत असल्याने पर्यायी मार्ग वापरून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

--------------

अत्यावश्यक सेवेत चष्म्याची दुकाने, सीए कार्यालयांना मुभा

अमरावती : चष्म्याची तसेच श्रवणयंत्राची दुकाने व सनदी लेखापालांची कार्यालये संचारबंदीच्या कालावधीत सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू राहू शकतील. तसा आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सोमवारी जारी केला. आदेशानुसार, कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यात १५ मेपर्यंत संचारबंदी आदेश लागू आहेत. जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यानुसार अत्यावश्यक सेवांतर्गत चष्म्याशी संबंधित असलेल्या सेवा व दुकाने, सनदी लेखापाल यांची कार्यालये, श्रवणयंत्र दुकाने व त्यासंबंधीच्या सर्व आस्थापना संचारबंदी कालावधीत सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

----------------------------

अखेर ‘त्या’ मैदानाच्या दाराची दुरुस्ती

अमरावती : रविनगर येथ छत्रपती प्ले-ग्राऊंडचे मुख्य प्रवेशद्वार कित्येक दिवसांपासून तुटले होते. स्थानिक नगरसेवकांकडे त्याबाबत विनंती करण्यात आली. सबब, युवा स्वाभिमान पक्षाचे शहर उपाध्यक्ष भूषण पाटणे यांनी स्वखर्चाने ते दार दुरुस्त केले.

---------------

Web Title: Summary news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.