सारांश बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:11 AM2021-05-15T04:11:30+5:302021-05-15T04:11:30+5:30

धामणगाव रेल्वे : तालुक्यातील येरड येथून नाकाबंदी दरम्यान अवैध रेती वाहून नेणारा ट्रक व रेती असा ६ लाख ३० ...

Summary news | सारांश बातम्या

सारांश बातम्या

Next

धामणगाव रेल्वे : तालुक्यातील येरड येथून नाकाबंदी दरम्यान अवैध रेती वाहून नेणारा ट्रक व रेती असा ६ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. १२ मे रोजी तळेगाव दशासर पोलिसांनी ही कारवाई केली. तळेगाव पोलिसांनी आरोपी आशिष दहाट (रा. गडवी, ता. बाभूळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपी चालकाजवळ एमएच २९ बीई ३५७८ या ट्रकचे कुठलेही कागदपत्र आढळून आली नाहीत.

-----------

शेंदूरजनाबाजार येथे तरुणाला मारहाण

तिवसा : तालुक्यातील शेंदूरजनाबाजार येथील योगेश कोकाटे (३३) याला मारहाण करण्यात आली. मजुरीच्या पैशाच्या वादातून ११ मे रोजी सायंकाळी ही घटना घडली. याप्रकरणी तिवसा पोलिसांनी आरोपी चेतन महिपाल ठाकूर (४०) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

-------------------

वरूडच्या माहेरवासिनीचा छळ

वरूड : येथील एका ३० वर्षीय माहेरवासिनीचा सासरी नागपूर येथे अमानुष छळ करण्यात आला. माहेरहून पैसा आणण्याचा तगादा व मूल होत नसल्याच्या कारणावरून पती व अन्य जणांनी आपल्याला घरातून हाकलून दिले, असेही १२ मे रोजी वरूड पोलिसांत नोंदविलेल्या तक्रारीत म्हटले आहे. वरूड पोलिसांनी याप्रकरणी आरोपी रफीक खान बशीर खान (नागपूर), शहजाद खान शहादत खान (जुना डायरा, वरूड), जियाउल्ला खाद (रा. नागपूर) व एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

-------------

दहिगाव फाट्याहून ट्रॅक्टर ट्रॉली जप्त

आसेगाव पूर्णा : आसेगाव ते चांदूर बाजार मार्गावरील दहिगाव फाट्यादरम्यान रेतीची अवैध वाहतूक करणारी ट्रॅक्टर ट्रॉली एक ब्रास रेतीसह जप्त करण्यात आली. १२ मे रोजी रात्री ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. आसेगाव पोलिसांनी याप्रकरणी आरोपी रोशन तळकित (२८) व दिनेश खडे (२४, तुळजापूर गढी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

-----------------

तरुणाच्या हाताला चावा

धारणी : शेतीच्या कारणावरीन वाद करून सुशील मिश्रा याच्या बोटाला चावा घेण्यात आला तथा जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. १२ मे रोजी तालुक्यातील टेंभली येथे ही घटना घडली. याप्रकरणी धारणी पोलिसांनी आरोपी प्रमोद मिश्रा (रा. टेंभली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

-----------

वरूड कुलट येथे तरुणाला मारहाण

येवदा : स्थानिक पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या वरूड कुलट येथे नीलेश पुंडकर (३४) याला काठीने मारहाण करण्यात आली. १२ मे रोजी जुन्या वैमनस्यातून हा प्रकार घडला. याप्ररणी येवदा पोलिसांनी आरोपी योगेश ऊर्फ छोटू पुंडकर (रा. वरूड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. उलटपक्षी एका महिलेच्या तक्रारीवरून नीलेश पुंडकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यात योगेश पुंडकर जखमी झाला. त्याला दर्यापूरला उपचारार्थ हलविल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

-----------

पांढरी येथे व्यक्तीवर चाकुहल्ला

अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील पांढरी येथे एका ३८ वर्षीय व्यक्तीवर चाकूने वार करण्यात आला. १२ मे रोजी दारूच्या कारणातून हा वाद झाला. याप्रकरणी अंजनगाव सुर्जी पोलिसांनी आरोपी अमोल मोहोड (३८, रा. पांढरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

-----------

दिवसातून तीन वेळा घ्या वाफ

अमरावती : वाफ घेण्याबरोबरच व्हिटॅमिन सी गोळ्या, झिंक गोळ्या व मल्टिव्हिटॅमिन गोळ्या घेण्याबाबत आहार व योग करण्याबाबतही विविध आरोग्यतज्ज्ञांनी सुचविले. दिवसातून तीन वेळा वाफ घ्यावयाची आहे व आपल्या नाकावाटे वाफेस श्वासाद्वारे शरीरात ओढणे व तोंडाने बाहेर सोडायची ही प्रक्रिया दहा वेळा करावयाची आहे. साध्या पाण्याने वाफ घेतली तरीही ते उत्तम ठरणार असल्याची माहिती डीएचओ दिलीप रणमळे यांनी दिली.

--------

कोरोना लसीकरणाला तुटवड्यामुळे मर्यादा

चांदूर रेल्वे : कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. मध्येच लस संपल्याने अनेक नागरिक लस न घेताच परतले आहेत. त्यामुळे शासन-प्रशासनाकडून ‘गो कोरोना’चे पाढे वाचले जात असताना, कोरोना जाईल कसा, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला. लसीकरणासाठी अन्य गावांतील लोक ग्रामीण भागाकडे धाव घेत आहेत.

------------

सिपना नदीच्या उदरातून अवैध उपसा

धारणी : तालुक्यातील उतावली गावाजवळून वाहणाऱ्या सिपना नदीवर धबधबा आहे. या धबधब्याखालील भागात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध राहतो. मात्र, यंदा उन्हाळी मुगाच्या पिकाचे संवर्धन करण्यासाठी लोकांनी जवळपास दोनशे ते अडीचशे फूट अंतरावर खाली उतरून त्या पाण्याचा सिंचनासाठी वापर सुरू केला आहे. त्याकडे तलाठी व महसूल खात्याने दुर्लक्ष चालविले आहे.

------------

नांदगाव खंडेश्वर तालुक्यात जपली आमराई

नांदगाव खंडेश्वर : आम्रवृक्षाचे आयुष्य ३०० ते ४०० वर्षांचे असते. आजोबा-पणजोबाने लावलेल्या झाडाचे आंबे नातू-पणतू खात असतात. आता गावरान आमराई दिसेनाशी झाली आहे. मात्र, तालुक्यातील काही कुटुंबांनी आमराई जपली आहे. तीनशे वर्षांपूर्वीची काही आंब्याची झाडे आजही अनेकांना फळे देत आहे.त

-------

स्वच्छतागृहांची दुरवस्था, पथके बेपत्ता

अमरावती : अनेक ग्रामपंचायतींनी गाव हागणदारीमुक्त झाले असल्याचे मोठा गाजावाजा केला असला तरी प्रत्यक्षात ग्रामीण भागातील स्थिती वेगळी आहे. काही ग्रामपंचायतींनी गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी पुढाकार घेऊन सार्वजनिक शौचालयांची निर्मिती केली. काही दिवस सार्वजनिक शौचालयाची देखभाल करण्यात आली. आता मात्र ते पडक्या अवस्थेत गेले आहेत. गुड मॉर्निंग पथके गुंडाळली गेली आहेत.

--------------------

तळणी-पिंपळखुटा रस्त्याची डागडुजी केव्हा?

मोर्शी : तालुक्यातील तळणी पिंपळखुटा मार्गाची चाळण झाली आहे. तीन महिन्यांपूर्वी केलेली दुरुस्ती वाहतुकीमुळे उखडली. दुरुस्ती करताना सुटलेले लहान खड्डे आता मोठे झाले आहेत. पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

-----------------

ग्रामपंचायत सदस्यांच्या पाठपुराव्याने खरवाडीत निर्जंतुकीकरण

तळवेल : तालुक्यातील खरवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य प्रमिला भोवते यांच्या पाठपुराव्याने गावात निर्जंतुकीकरण करण्यात आले. निवेदनाचा मान ठेवून ग्रामपंचायतीमार्फत तात्काळ केलेल्या फवारणीबद्दल भोवते यांनी ग्रामपंचायत कार्यालयाचे आभार मानले. खरवाडीमध्ये देखील कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

--------------

---------------

फोटो पी १४ मनपा

मास्क न लावणाऱ्यांकडून दंड वसूल

अमरावती : १२ मे रोजी सकाळी ८ वाजता महेंद्र कॉलनी येथील परिसरात मोहीम राबविण्यात आली. तोंडावर मास्क न लावणा-या तीन नागरिकांकडून १५०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला. सदर कारवाईदरम्यान आरोग्य निरीक्षक एस.डी. हानेगावकर, ए.के. गोहर, भागिरथ खैरकर, वरिष्ठ लिपिक मिठाराम सावलकर उपस्थित होते.

----------

कोरोना अहवाल नसणाऱ्यांना दंड

अमरावती : नोडल अधिकारी पी.एम. वानखडे, सहायक क्षेत्रीय अधिकारी संजय गंगात्रे, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक विकी जेधे यांच्या उपस्थितीत जवाहर गेट, सक्करसाथ, अंबागेट, खोलापुरी गेट, कश्मीर विहार भातकुली रेल्वे क्रॉसिंग परिसरात कारवाई करण्यात आली. आरटी-पीसीआर रिपोर्ट नसल्याबाबत १००० रुपयांप्रमाणे ३००० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला. सदर मोहिमेमध्ये झोन क्र. ५ मधील अभियंता, स्वास्थ्य निरीक्षक, कर निरीक्षक, पोलीस पथक व कर्मचारी सहभागी झाले होते. १२ मे रोजी ही कारवाई करण्यात आली.

----------------------

भारतीय अन्न महामंडळाची विभागीय कार्यालये औरंगाबाद व अमरावतीत

अमरावती : भारतीय अन्न महामंडळाची दोन विभागीय कार्यालये औरंगाबाद आणि अमरावती येथे तातडीने कार्यान्वित होत आहेत. ही कार्यालये मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ क्षेत्रांसाठी सेवा पुरविणार आहेत, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. ही कार्यालये सुरू झाल्यामुळे, कार्यक्षमपणे व जलदगतीने कामे होण्यासाठी एफसीआयच्या संबंधित विभागीय कार्यालयांशी संपर्क साधणे सोयीस्कर होणार आहे.

---------

फोटो पी १४ टाकरखेडा

लसीकरणाकरिता टाकरखेडा संभू येथे नागरिकांची तोबा गर्दी

टाकरखेडा संभू : येथे लसीचे केवळ ६० डोज प्राप्त झाले असताना, गावासह परिसरातील व शहरातील शेकडो नागरिकांनी गावात गर्दी केली होती. यामुळे आरोग्य विभागाची चांगलीच तारांबळ उडाली. इतर गावांतील नागरिक गावात दाखल झाल्याने गावातील शेकडो नागरिक लसीपासून वंचित राहिले.

-------

कुऱ्हा पोलीस ठाण्यात शांतता समिती सभा

कुऱ्हा : स्थानिक पोलीस ठाण्यात दुय्यम ठाणेदार राजेंद्र जोशी यांच्या उपस्थितीत शांतता सभेचे आयोजन करण्यात आले. रमजान ईद साध्या पद्धतीने साजरी करावी, या जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाचे वाचन करण्यात आले. शांतता समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Web Title: Summary news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.