सारांश बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:10 AM2021-05-29T04:10:46+5:302021-05-29T04:10:46+5:30

चिखलदरा : तालुक्यातील मरियमपूर येथे रमेश बेलसरे (७५) यांना काठीने मारहाण करण्यात आली. २५ मे रोजी ही घटना घडली. ...

Summary news | सारांश बातम्या

सारांश बातम्या

Next

चिखलदरा : तालुक्यातील मरियमपूर येथे रमेश बेलसरे (७५) यांना काठीने मारहाण करण्यात आली. २५ मे रोजी ही घटना घडली. याप्रकरणी चिखलदरा पोलिसांनी आरोपी प्रेम किल्लेदार (३५, मरियमपूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

----------

हिराबंबई येथे महिलेला मारहाण

धारणी: तालुक्यातील हिराबंबई येथील एका ४५ वर्षीय महिलेला मारहाण करण्यात आली. २५ मे रोजी सायंकाळी घटना घडली. याप्रकरणी रायसिंग रावत, रघुनाथ रावत, सुंदर या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

-------------

कुऱ्हा देशमुख येथून रेतीचा टिप्पर जप्त

शिरजगाव कसबा: स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुऱ्हा देशमुख बसस्टॅन्ड भागातून दीड ब्रास रेतीसह आठ लाखांचा टिप्पर व मोबाईल जप्त करण्यात आला. २६ मे रोजी पहाटे ६ च्या सुमारास स्थानिक पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी आरोपी विजय भिंगारे (३४, थुगाव पिंपरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

-------------

सातेफळ कामनापूर मार्गावरून रेती जप्त

तळेगाव दशासर : सातेफळ ते कामनापूर मार्गावरून एमएच २७ एल २५४६ या क्रमांकाचा ट्रॅक्टर रेतीने भरलेल्या ट्रॉलीसह जप्त करण्यात आला. २६ मे रोजी ही कारवाई करण्यात आली. तळेगाव दशासर पोलिसांनी आरोपी संजय सावदे, संदीप मेटे (दोन्ही रा. सोनगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.

-------------

बलात्कारानंतर गर्भधारणा

चांदूर रेल्वे : लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करण्यात आले. त्यातून ती गर्भवती राहिली. १ नोव्हेंबर २०२० ते २६ मेपर्यंत हा प्रकार घडला. याप्रकरणी चांदूर रेल्वे पोलिसांनी आरोपी गौरव गडपायले (२०, आमदोरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

------------

टवलार शिवारातून शेती साहित्य लंपास

पथ्रोट : अचलपूर तालुक्यातील टवलार शिवारातील झोपडीतून जुने टिन, बैलगाडीचे चाक, लोखंडी पाईप, डवरे असा एकूण ३२,५०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला. २५ ते २६ मे दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी पथ्रोट पोलिसांनी शिवाजी चित्रकार यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.

--------------

अंजनगावात भावंडात मारहाण

अंजनगाव सुर्जी : येथील नौगाजी प्लॉटमधील मो. जाकीर मो. रफीक याला मारहाण करण्यात आली. २६ मे रोजी ही घटना घडली. याप्रकरणी अंजनगाव पोलिसांनी आरोपी मो. साजिद अ. रफीक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

------------

हंतोडा येथे वैमनस्यातून मारहाण

अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील हंतोडा येथे मोहन आठवले यांना जुन्या वैमनस्यातून मारहाण करण्यात आली. २६ मे रोजी सायंकाळी ही घटना घडली. याप्रकरणी अंजनगाव सुर्जी पोलिसांनी आरोपी बाळू इंगळे, नितेश इंगळे, गजानन गवई व एका महिलेविरुद्ध गुन्हा नोंदविला.

-------------

बहादा रोडवरील बांधकाम साहित्य लंपास

वरूड : तालुक्यातील बहादा रोडवरून ३१ हजार ५०० रुपये किमतीचे बांधाकाम साहित्य लंपास करण्यात आले. २३ ते २६ मे दरम्यान ही घटना घडली. सुपरवायझर वानखडे यांच्या तक्रारीवरून वरूड पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला.

-------------

फोटो पी २८ मनपा

मनपात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी

अमरावती : महापौर चेतन गावंडे यांचे हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे प्रतिमेस हारार्पण करण्यात आले. यावेळी उपमहापौर कुसुम साहू, स्थायी समिती सभापती सचिन रासने, मनपा आयुक्त प्रशांत रोडे, सभागृह नेता तुषार भारतीय, गटनेता चेतन पवार, नगरसेवक अजय सारसकर, उपआयुक्त सुरेश पाटील, सहायक संचालक नगर रचना आशिष उईके, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर उपस्थित होते.

------------

फोटो पी २८ लोणी

लोणी येथील कोविड केअर सेंटर

वरूड : तालुक्यातील लोणी येथील मंगल कार्यालयात कोविड केअर सेंटर सुरू झाल्याने परिसरातील रुग्णांना दिलासा मिळणार आहे. जिल्हा परिषद सदस्य सीमा स्वर्गे, सरपंच अश्विनी दवंडे, उपसरपंच रवि तिखे, सदस्य प्रकाश सनेसर, अविनाश सोनारे, दिनेश गुल्हाने, तलाठी राजेंद्र जंगले, ग्रामसेवक ओंकार धोटे, डॉ. अश्विन जणेकर, अजय चोरडे, सतीश पाटणकर, प्रफुल तिखे, दिनेश गुल्हाने, रवि तिखे, सुरेंद्र ठाकरे उपस्थित होते.

-------------------

फोटो पी २८ शिंदी

शिंदी बु. येथे कोविड लसीकरण

शिंदी बु : अचलपूर तालुक्यातील शिंदी बु. येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच रजनी गजभिये, सदस्य अश्विनी पेटकर, शेख इस्माईल शेख बहाद्दर, संजय वाठ, मधुकर इंगळे, समाधान गाडगे, डॉ. गणेश मालखेडे, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब ठोकणे यांनी सहकार्य केले.

------------

बुद्ध जयंतीदिनी गरजुंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

शिंदी बु : तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त शिंदी बु. येथील गरजूंना राहुल गाठे यांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. या उपक्रमात पृथ्वीराज गजभिये, विशाल खानझोडे, देवानंद गजभिये, दुर्योधन सूर्यवंशी व विनीत वानखडे यांचा सहभाग होता.

-----------

Web Title: Summary news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.