शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

पित्याची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या, धामणगाव गढी येथील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2017 18:00 IST

मागील तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या बाप-लेकांचा मृतदेह शनिवारी दुपारी २ च्या सुमारास अचलपूर तालुक्यातील धामणगाव गढी येथील एका विहिरीत आढळून आला.

परतवाडा - मागील तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या बाप-लेकांचा मृतदेह शनिवारी दुपारी २ च्या सुमारास अचलपूर तालुक्यातील धामणगाव गढी येथील एका विहिरीत आढळून आला. यामुळे परिसरात एकच खळबळ माजली. 

सदानंद लालजी दहीकर (३५, रा. फुकटपुरा, धामणगाव गढी) याने गौरव (५) व पिनू (७) या अपत्यांसह विहिरीत उडी घेतली. धामणगाव गढी येथील दीपक अग्रवाल यांच्या शेतातील मजूर शनिवारी दुपारी विहिरीवर गेला असताना त्याला तिघांचे मृतदेह पाण्यात आढळले. सदानंद दहीकर हा आचारीचे काम करीत होता, तर त्याची पत्नी चिखलदरा तालुक्यातील कालापानी या सहा किलोमीटर अंतरावरील गावात राहत होती.

सदानंदला काही दिवसांपासून दारूचे व्यसन जडले होते. तो मुला-मुलीसह गुरुवार सायंकाळपासून बेपत्ता होता. घटनास्थळी दाखल झालेल्या परतवाडा पोलिसांनी गावक-यांच्या मदतीने तिघांचेही मृतदेह विहिरीबाहेर काढून शवविच्छेदनासाठी अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. आत्महत्येच्या कारणांचा तपास परतवाडा पोलीस करीत आहेत. प्रथमदर्शनी जरी ही आत्महत्या वाटत असली तरीदेखील शवविच्छेदन अहवालानंतर अनेक बाबी स्पष्ट होतील. तूर्तास मर्ग दाखल केला असल्याचे परताड्याचे ठाणेदार संजय सोळंके यांनी सांगितले. 

पत्नी होती माहेरी मागील काही दिवसांपासून सदानंदची पत्नी माहेरी गेली होती. पत्नीला अनेकदा घरी परत आणण्याचा त्याने प्रयत्न केला. मात्र, ती परत आली नाही. यामुळे तो कमालीचा निराश झाला होता. यातूनच त्याने आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.