शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

फुलपाखरांना मराठीतून नावं देण्याची मोहीम; जैवविविधता मंडळाचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2019 18:48 IST

फुलपाखरू हे जैवविविधतेमधील महत्त्वाचे घटक आहे. निसर्ग अभ्यासक आणि सामान्यांसाठी तो नेहमीच आकर्षणाचा विषय असतो. जीवसृष्टीमधील आकर्षक असे कीटक म्हणजे फुलपाखरू.

ठळक मुद्देमहाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाने फुलपाखरांना मराठीतून नावे देण्याची मोहीम सुरू केली आहे. जगाच्या तुलनेत दोन टक्के भूभागावर ११ टक्क्यांपेक्षा अधिक प्रजाती भारतात आढळतात.निसर्गप्रेमी, जैवविविधता अभ्यासक, तज्ञ्ज, नागरिकांकडून फुलपाखरांच्या मराठी नावांवर सूचना मागविल्या आहेत. 

अमरावती : फुलपाखरू हे जैवविविधतेमधील महत्त्वाचे घटक आहे. निसर्ग अभ्यासक आणि सामान्यांसाठी तो नेहमीच आकर्षणाचा विषय असतो. जीवसृष्टीमधील आकर्षक असे कीटक म्हणजे फुलपाखरू. मात्र, या फुलपाखरांची बहुतांश नावे इंग्रजीतील आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाने फुलपाखरांना मराठीतून नावे देण्याची मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे निसर्गप्रेमी, जैवविविधता अभ्यासक, तज्ञ्ज, नागरिकांकडून फुलपाखरांच्या मराठी नावांवर सूचना मागविल्या आहेत. 

देशात फुलपाखरांची जैवविविधता संपन्न अशी आहे. जगाच्या तुलनेत दोन टक्के भूभागावर ११ टक्क्यांपेक्षा अधिक प्रजाती भारतात आढळतात. या प्रजाती १५०० वर आहेत. यापैकी २८५ प्रजातीचे फुलपाखरू महाराष्ट्रात आढळतात. त्यांना ओळखण्यासाठी लॅटीन भोषत शास्त्रीय नावे किंवा इंग्रजीत सामान्य नावे आहेत. देशात फुलपाखरांचा अभ्यास ब्रिटिशांच्या काळात  झाला. त्यामुळे फुलपाखरांना त्यावेळी ब्रिटीश अधिकाऱ्यांनी नावे दिली आहेत.

सामान्यत: नावे ही त्यांचे रंग, रूप, आकार, अंगावरील ठिपके, सवय, वागणूक, त्यांचा सहवास किंवा शोधकर्त्यावरून नावे देण्यात आली आहे. परंतु, महाराष्ट्रातील फुलपाखरांना मराठीतून नावे असावीत. ती सोपी आणि लक्षात ठेवता यावी, सर्वसामान्यांना ओळखता यावी, यासाठी महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाने फुलपाखरांना नावे ठरविण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. यासमितीने राज्यात आढळणाºया फुलपाखरांना नावे ठरविण्यासाठी अटी, नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यानुसार अभ्यासक, निसर्गप्रेमी आदींना विविध माध्यमांच्याद्वारे पाठवून त्यावर सर्वांची मते, सूचना जाणून घेण्यात येणार आहे. २८५ प्रजातींच्या फुलपाखरांना मराठीतून नावे देण्यात येणार आहे.

या निकषावर असेल फुलपाखरांचे मराठीकरण

फुलपाखरांचे दिसणे, सवयी, शास्त्रीय नाव, खाद्य वनस्पती, इंग्रजी नावांचे भाषांतर, नावे सोपी व सुटसुटीत असावी, सामान्य माणसाला मराठी नावे कळावीत, असे निकष ठरविले आहे. महाराष्ट्र जैवविविधता मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन सूचना सादर कराव्या लागणार आहे. ११ मे २०१९ पर्यंत सूचना पाठवायच्या आहेत, अशी माहिती जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष विलास बर्डेकर यांनी दिली आहे.

 

टॅग्स :Amravatiअमरावती