शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
6
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
7
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
8
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
9
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
10
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
11
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
12
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
13
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
14
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
15
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
16
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
17
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
18
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
19
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
20
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना

सुकळीच्या बायोमायनिंग प्रकल्पाला आचारसंहितेची धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 22:06 IST

शहरालगत सुकळी येथे ३५ वर्षांपासून साचलेल्या घनकचऱ्याची आता शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लागणार आहे. यासाठी शासनाने ३७.९७ कोटींचा डीपीआर मंजूर केला. यामध्ये सर्वांत महत्त्वाच्या असणाऱ्या बायोमायनिंगचा प्रकल्पासाठी ७.५४ कोटींची निविदा दुसऱ्यांदा प्रसिद्ध करण्यात आली. कंत्राटदाराची निश्चिती न झाल्यास प्रकल्प आचारसंहितेच्या बडग्यात अडकणार आहे.

ठळक मुद्देदुसऱ्यांदा निविदा : शासनाद्वारे ३७.९७ कोटींच्या डीपीआर मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरालगत सुकळी येथे ३५ वर्षांपासून साचलेल्या घनकचऱ्याची आता शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लागणार आहे. यासाठी शासनाने ३७.९७ कोटींचा डीपीआर मंजूर केला. यामध्ये सर्वांत महत्त्वाच्या असणाऱ्या बायोमायनिंगचा प्रकल्पासाठी ७.५४ कोटींची निविदा दुसऱ्यांदा प्रसिद्ध करण्यात आली. कंत्राटदाराची निश्चिती न झाल्यास प्रकल्प आचारसंहितेच्या बडग्यात अडकणार आहे.सुकळी येथे मागील तीन दशकांपासून साचलेले कचºयाचे डोंगर व त्याला सतत लागणाऱ्या आगीमुळे प्रदूषणाची मोठी समस्या निर्माण झालेली आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रात सुकळी येथे कम्पोस्ट डेपो तसेच साईनगर, अकोली गावठाण व बडनेरा येथे जमा होणाºया ओल्या व सुक्या कचऱ्यावर शास्त्रशुद्ध पद्धतीने विलगीकरण करणे या प्रकल्पाला शासनाने बायोमायनिंगच्या सुधारित दरासोबत ३७.९७ कोटींचा डीपीआर मंजूर केला.नगर विकास विभागाद्वारे १३ नोव्हेंबर २०१८ रोजी या प्र्रक्रियेला मान्यता देऊन ३७.९७ कोटींचा निधी मंजूर केला. हा डीपीआर शासनाद्वारे नियुक्त मार्श प्लॅनिंग अ‍ॅन्ड इंजिनीअरिंग कंपनीद्वारे करण्यात आला. यामध्ये ५.५४ कोटी हे बायोमायनिंगसाठी राहणार आहेत. सुकळी कम्पोस्ट डेपोच्या ९.३५ हेक्टर जागेवर जवळपास दोन लाख मेट्रिक टन कचरा साचलेला आहे. या कचºयाची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावून त्याच ठिकाणी सहा महिन्यात हा कायमस्वरूपी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. महापालिकेने १७ डिसेंबरला ही निविदा काढली. यामध्ये तीन कंत्राटदारांनी निविदा भरली. मात्र, एक अपात्र ठरल्याने पुन्हा ४ फेब्रुवारी २०१९ ला दुसरी निविदा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आचारसंहितेपूर्वी कंत्राटदाराची निश्चिती न झाल्यास प्रकल्प रेंगाळणार आहे.सुकळी कंपोस्ट डेपोकरिता २५.३७ कोटींचा खर्चसुकळी कम्पोस्ट डेपोकरिता एकूण २७.३७ कोटींचा खर्च होणार आहे. यामध्ये कचरा विलगीकरणात डम्पिंग यार्डसाठी २४.६० लाख, एमआरएफ शेड ५१.९३ लाख, विंड्रा प्लॅटफार्म ३.३० लाख, बायोगॅस प्लांट २.५६ कोटी असे ६.६३ कोटी, कचरा टाकण्याच्या व्यवस्थेसाठी ५ कोटी, जागेवरील इतर सुविधांमध्ये सुरक्षा रक्षक रूम ३.८७ लाख, प्रसाधनगृह २.५१ लाख, पाण्याच्या निचºयाची व्यवस्था १०.८७ लाख, अंतर्गत रस्ते १२.८२ लाख, जुन्या कचºयावर बायोमायनिंग ५.५४ कोटी, जागेवर हिरवळ ३.२१ कोटी, व्यवस्थापन इमारत २.२७ लाख, आग नियंत्रण व्यवस्था ०.७८ लाख, पाणी व्यवस्था ५.०२ लाख, विद्यृत व्यवस्था, सुरक्षा १८.७२ लाख, जीएसटी भरणा १.४४ कोटी व यंत्रसामग्री भरणा ६.१४ कोटींचा राहणार आहे.अकोली, बडनेरा कम्पोस्ट डेपोकरिता ११.६० कोटीसुकळीप्रमाणे साईनगर-अकोली गावठाण कम्पोस्ट डेपो हा २.८३ हे.आर क्षेत्रात राहणार आहे. यासाठी ७०७.९१ लाखांचा निधी खर्च होणार आहे. त्याच्या देखभालीसाठी महापालिकेला वार्षिक १५४.८९ कोटींचा खर्च येणार आहे.बडनेरा आॅक्ट्राय नाका कम्पोस्ट डेपोकरिता ४५२.५५ लाखांचा निधी खर्च होणार आहे. याचे देखभाल, दुरुस्ती व चालविण्यावर महापालिकेचा ६१.६१ लाखांचा निधी खर्च होणार आहे.