शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पती पोलीस प्रशिक्षणाकरिता वाशिमला अन् घरात गळफास लावून पत्नीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2022 16:04 IST

शुक्रवारी सकाळी ७ वाजता मुले झोपेतून उठली असता, त्यांना आई पंख्याला गळफास लावलेल्या अवस्थेत दिसली.

ठळक मुद्देवरूड येथील साईसंगम कॉलनीतील घटना

वरूड (अमरावती) : बेनोडा (शहीद) पोलीस ठाण्यात कार्यरत उपनिरीक्षक गणपत पुपुलवार यांच्या ३२ वर्षीय पत्नीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी ७ वाजता ही घटना उघडकीस आली. पती दोन दिवसांच्या पोलीस प्रशिक्षणाकरिता वाशिमला गेल्याने घरी केवळ लहान मुलांसह पत्नीच होती.

पोलीस सूत्रांनुसार, गंगा गणपत पुपुलवार (३२, ह.मु. साईसंगम कॉलनी, वरूड) असे मृताचे नाव आहे. पती गणपत पुपुलवार हे बेनोडा पोलीस ठाण्यात उपनिरीक्षकपदावर कार्यरत आहेत. ते दोन दिवसांच्या प्रशिक्षणाकरिता वाशिमला गेले होते. घरी केवळ गंगा यांच्यासह आठ वर्षीय गौरव आणि चार वर्षीय गौरी ही मुले असे तिघेच होते. शुक्रवारी सकाळी ७ वाजता मुले झोपेतून उठली असता, आईने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे कळल्यावर त्यांच्या शेजारच्यांना बोलावले आणि एकच हंबरडा फोडला. या घटनेमुळे साईसंगम कॉलनीत खळबळ उडाली आहे.

आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नसून, वरूडचे ठाणेदार प्रदीप चौगावकरसह पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता ठेवला आहे. नातेवाईक आल्यानंतर शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे ठाणेदार प्रदीप चौगावकर यांनी सांगितले. या घटनेबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक सारिका बागडेसह वरूड पोलीस पुढील तपास करीत आहे .

टॅग्स :Deathमृत्यूAmravatiअमरावतीPoliceपोलिस