शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

ऑनलाईन परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचा राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2022 05:01 IST

एनएसयूआयचे राष्ट्रीय महासचिव नागेश करिआप्पा, प्रदेशाध्यक्ष आमीर शेख, प्रदेश महासचिव आकांक्षा ठाकूर, एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष संकेत कुलट यांच्या नेतृत्वात शेकडो विद्यार्थ्यांनी विद्यापीठावर धाव घेतली. ‘जैसी शिक्षा वैसी परीक्षा’ असा गगनभेदी नारा देत एनएसयूआयच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेशद्वारावर चढून विद्यापीठात प्रवेश केला. त्यामुळे  विद्यापीठात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने उन्हाळी परीक्षा २०२२ ऑनलाइन घ्याव्यात, या मागणीसाठी एनएसयूआयच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी विद्यापीठात शुक्रवारी जोरदार राडा केला. मागण्यांचे पत्रकही फेकले. दरम्यान पोलिसांसोबत झटापटही झाली. विद्यार्थी आक्रमक होत असल्याने पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांच्याशी चर्चा करून शिष्टमंडळाने मागण्याचे निवेदन सादर केले. मात्र, एनएसयूआयचे आंदोलन म्हणजे महाविकास आघाडी सरकारला घरचा अहेर ठरला, असे बोलले जात आहे. एनएसयूआयचे राष्ट्रीय महासचिव नागेश करिआप्पा, प्रदेशाध्यक्ष आमीर शेख, प्रदेश महासचिव आकांक्षा ठाकूर, एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष संकेत कुलट यांच्या नेतृत्वात शेकडो विद्यार्थ्यांनी विद्यापीठावर धाव घेतली. ‘जैसी शिक्षा वैसी परीक्षा’ असा गगनभेदी नारा देत एनएसयूआयच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेशद्वारावर चढून विद्यापीठात प्रवेश केला. त्यामुळे  विद्यापीठात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कुलगुरूंच्या दालनाकडे प्रवेशासाठी विद्यार्थी आक्रमक झाले असताना पोलीस आणि एनएसयूआयच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. काही वेळातच पोलीस उपायुक्त एम. एम. मकानदार विद्यापीठात दाखल झाले. फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याचे पथक आंदोलक विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवून असताना क्यूआरटी पथकही पोहोचले. काही वेळाने एनएसआयूआयचे शिष्टमंडळ कुलगुरूंसोबत चर्चा करण्यासाठी गेले असता, बाहेर आंदोलक विद्यार्थ्यांची नारेबाजी सुरूच ठेवली. गत आठवड्यात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांनी सर्व विद्यापीठांच्या परीक्षा ऑफलाइन होतील असा निर्णय घेतला. तथापि, काँग्रेसप्रणीत एनएसयूआयने ऑनलाईन परीक्षेसाठी काढलेल्या मोर्चामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये एकवाक्यता नाही, असे चित्र दिसून आले. 

परीक्षांमध्ये एकसूत्रता आणण्यासाठी ना. उदय सामंत यांनी ऑफलाइन परीक्षेचा निर्णय घेतला. त्यानुसार विद्यापीठाने तयारी चालविली आहे. मात्र, एनएसयूआयने ऑनलाइन परीक्षांविषयी निवेदन दिले, ते शासनाकांकडे पाठविले जाईल. - डॉ. दिलीप मालखेडे, कुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ

विद्यार्थ्यांनी पोलिसांशी झटापट केली नाही. विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षेविषयी तीव्र भावना होत्या. शिक्षण ऑनलाइन झाले तर परीक्षा ऑफलाईन का, विद्यार्थी हितासाठी हे आंदोलन होते. सरकार कोणत्याही पक्षाचे असो, विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी लढा कायम राहील.- आमीर शेख, प्रदेशाध्यक्ष, एनएसयूआय

 

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थी