शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

मराठीतून विद्यार्थ्यांना घेता येणार वैद्यकीय शिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 10:57 IST

Amravati : पीएम नरेंद्र मोदी यांनी केले 'मेडिकल'चे ऑनलाइन उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या निर्मितीमुळे वैद्यकीय शिक्षण घेण्यास इच्छुक पात्र विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच आता येथे प्रवेशित विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेतून म्हणजेच मराठीतून देखील वैद्यकीय शिक्षण घेता येणार असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले. प्रवेश प्रक्रियेसाठी मान्यता मिळालेल्या राज्यातील दहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन बुधवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले. यामध्ये अमरावती वैद्यकीय महाविद्यालयाचा देखील समावेश आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे ते उद्घाटन करण्यात आले. अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन नियोजन भवनात करण्यात आले होते. यावेळी खा. डॉ. अनिल बोंडे, आ. रवी राणा, आ. प्रताप अडसड, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, मनपा आयुक्त सचिन कलंत्रे, अपर जिल्हाधिकारी सूरज वाघमारे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, डॉ. अनिल बत्रा, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातूरकर उपस्थित होते. नव्याने निर्माण होणारे वैद्यकीय महाविद्यालय लाखो परिवारांचे सेवेचे केंद्र ठरणार असल्याचे पीएम नरेंद्र मोदी म्हणाले. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे ऑनलाइन उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे हा कार्यक्रम पार पडला. यानंतर काही वेळाने आमदार रवी राणा यांनी या वैद्यकीय महाविद्यालयातील व त्याला संलग्न ४३० खाटांच्या रुग्णालयासाठी मंजूर करण्यात आलेल्या आलियाबाद येथील शासकीय जागेवर भूमिपूजन कार्यक्रमही पार पडला.

टॅग्स :medicineऔषधंAmravatiअमरावतीEducationशिक्षण