शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

पन्नास ते साठ गुणांचे पेपर सोडवूनही शून्य गुण; विद्यार्थ्यांची विद्यापीठावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 18:40 IST

विद्यार्थ्यांचा मूल्यांकनावर आक्षेप

अमरावती : एम.एस्सी. प्रथम वर्ष सेमिस्टर पॅटर्न हिवाळी २०१९ परीक्षेत गणित विषयात विद्यार्थ्यांना गुण कमी अथवा काहींना शून्य गुण मिळाल्याने विद्यार्थ्यांनी मूल्यांकनावरच आक्षेप घेतला आहे. सोमवारी एम.एस्सी.च्या असंख्य विद्यार्थ्यांनी विद्यापीठावर धडक देत प्र-कुलगुरू, कुलसचिव आणि परीक्षा व मूल्यांकन मंडळाच्या संचालकांची भेट घेत आपबिती कथन करत ठिय्या मांडला. ६० ते ७० गुणांचे पेपर सोडविले असताना शून्य अथवा ५, १० गुण कसे, असा सवाल उपस्थित करण्यात आला. शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, विद्याभारती महाविद्यालय, नरसम्मा महाविद्यालय, अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर शिक्षण विभागात एम.एस्सी.ला प्रवेशित गणित विषयांच्या विद्यार्थ्यांचा त्यात सहभाग होता. एनएसयूआयने एम.एस्सी. विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी पुढाकार घेतला. गणित विषयाच्या टोपोलॉजी, अ‍ॅडव्हॉन्स अ‍ॅबस्ट्रॉक पेपरमध्ये मिळालेले गुण फारच कमी आहे. काही विद्यार्थ्यांनी ५० ते ६० गुणांचे प्रश्न सोडविले असताना शून्य गुण कशाच्या आधाराने देण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चुकीच्या पद्धतीने मूल्यांकन होत असल्याचा आक्षेप घेतला. स्थानिक शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेतील प्रियंका उंबरकर या विद्यार्थिनीला अ‍ॅडव्हॉन्स अ‍ॅबस्ट्रॉक पेपरमध्ये केवळ १ गुण मिळाल्याची उत्तरपत्रिका निवेदनासोबत जोडली आहे. हिवाळी परीक्षेचे निकाल जाहीर होत असताना एम.एस्सी. गणित विषयात कमी गुण मिळाल्याची ओरड सुरू झाल्याने मूल्यांकनात नेमक्या कोणत्या त्रुटी राहिल्या, याकडे नजरा लागल्या आहेत. विद्यार्थ्यांसोबत एनएसयूआयचे प्रदेश सचिव संकेत बोके, युवक काँग्रेसचे नीलेश व्यवहारे, आदित्य साखरे, सूरज अढाळक, अनिकेत सातपुते यांच्यासह विद्यार्थ्यांनी मूल्यांकनावर आक्षेप घेतला.

दोन दिवसांत फेरतपासणीचे अर्ज सादर केले जाणार आहे. १० दिवसांत एम.एस्सी.च्या विद्यार्थ्यांना न्याय देण्याबाबत निर्णय झाला आहे. यात विद्यापीठाने विद्यार्थ्यांवर अन्याय केला, तर याचे तीव्र पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाही.

- संकेत बोके, प्रदेश सचिव, एनएसयूआय.

एम.एस्सी. प्रथम वर्ष गणित विषयाचे १५ फेब्रुवारीपर्यंत पुनर्मूल्यांकन करण्यात येणार आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांना ६ फेब्रुवारीपर्यंत फेरतपासणीसाठी अर्ज सादर करावे लागतील. गणित विषयाचा सरासरी निकाल चांगला असतानाही विद्यार्थ्यांच्या मागणीची पूर्तता करण्यात येईल.- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ, अमरावती विद्यापीठ 

टॅग्स :Studentविद्यार्थी