शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
3
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
4
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
5
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
6
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
7
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
8
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
9
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
10
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
11
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
12
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
13
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
14
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
15
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
16
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
17
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
18
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
19
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
20
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश

संघर्षातून ‘त्या’ तिघींची आकाशभरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 22:28 IST

घरात शिक्षणाचा गंध नाही, त्यात कुणाचेच मार्गदर्शन नाही; पण आकाशाला गवसणी घालण्याची जिद्द होती. त्याच्या बळावर असंख्य अडचणींवर मात करीत सख्ख्या तिघी बहिणींनी क्रीडा क्षेत्रात दरारा निर्माण केला. रॅकेटवर अधिराज्य गाजवणाऱ्या दोघी आणि पैलवानी करणाºया लहानगीचा प्रवास थक्क करणारा आहे.

ठळक मुद्देहिरपूरच्या बहिणीचा थक्क करणारा प्रवास : क्रीडा क्षेत्रात नावलौकिक

मोहन राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : घरात शिक्षणाचा गंध नाही, त्यात कुणाचेच मार्गदर्शन नाही; पण आकाशाला गवसणी घालण्याची जिद्द होती. त्याच्या बळावर असंख्य अडचणींवर मात करीत सख्ख्या तिघी बहिणींनी क्रीडा क्षेत्रात दरारा निर्माण केला. रॅकेटवर अधिराज्य गाजवणाऱ्या दोघी आणि पैलवानी करणाºया लहानगीचा प्रवास थक्क करणारा आहे.धामणगाव रेल्वे तालुक्यातील दोन हजार लोकवस्तीच्या हिरपूर येथील शेतमजुरी करणाºया बोंडेकार कुटुंबातील विजया, आरती, हर्षाली या तिघी शालेय क्रीडा स्पर्धेत विभागस्तरावर बॉल बॉडमिंटन या खेळामध्ये जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहेत. हातावर आणून पानावर खाणारे पुरुषोत्तम बोंडेकार यांनी शेतमजुरीवरच तिन्ही मुलींना उच्च शिक्षण घेता यावे, त्यांना कुठल्याही बाबतीत अडचणी निर्माण होऊ नये, यासाठी धडपड चालविली आहे. त्यांच्या श्रमाचे चीज काही अंशी झाल्याचे समाधान त्यांच्या चेहºयावर झळकू लागले आहे.विजया, आरतीची अशीही विजयश्रीबोंडेकर कुटुंबातील सर्वांत मोठी विजया ही आर.के. विद्यालय पुलगाव येथे नवव्या वर्गात शिकते. दुसºया वर्गापासून तिने बॉल बॉलमिंटन खेळात इच्छा दर्शवून उत्कृष्ट प्रदर्शन केले. त्या खेळाविषयी गोडी वाढत गेली. पाच सुवर्णपदके तिच्या खात्यात जमा झाले आहेत. दररोज दोन तास मैदानावर सराव व चार तास अभ्यास ती करते. याच विद्यालयात सहावीत शिकणारी आरती बोंडेकार हिने याच खेळात तीन कांस्य पदके पटकाविली. विजया ही १९ वर्षांखालील गटात, तर आरती चौदा वर्षांखालील गटात विभागीय स्तरावर प्रतिनिधीत्व करणार आहेत.हर्षालीचा खडतर प्रवासइयत्ता दुसऱ्या वर्गापासून कब्बड्डी स्पर्धेत नावलौकिक मिळवणारी हर्षाली बोंडेकार हिचा प्रवास अतिशय खडतर आहे. अनेक वेळा पाय व हाताला गंभीर जखमा तिला झाल्या. अखेर आपल्या खेळात बदल करीत तिने ४०० मीटर शर्यतीत नैपुण्य प्राप्त केले. तीही शालेय स्पर्धेत विभागीय स्तरावर जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे.आम्हा तिन्ही बहिणींना गाव व तालुक्याचे नाव मोठे करायचे आहे. क्रीडाक्षेत्रात नाव कमवायचे आहे. त्यासाठी हा जिद्दीचा प्रवास आहे.- विजया बोंडेकारबॅडमिंटनपटू