शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

'ATC' पदासाठी जोरदार स्पर्धा, ‘५०० कोटीं’च्या खुर्चीकरिता मंत्रालयात लॉबिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 17:51 IST

‘५०० कोटीं’च्या खुर्चीकरिता मंत्रालयात लॉबिंग : आयएस, आदिवासी, वनविभागाचे अधिकारी ठिय्या मांडून

ठळक मुद्दे‘५०० कोटीं’च्या खुर्चीकरिता मंत्रालयात लॉबिंग : आयएस, आदिवासी, वनविभागाचे अधिकारी ठिय्या मांडून तत्कालीन अपर आयुक्त पी. प्रदीपचंद्रन यांची नाशिक येथील विभागीय अपर आयुक्त म्हणून बदली झाली आहे.

गणेश वासनिक

अमरावती : आदिवासी विकास विभागाच्या अमरावती येथील अपर आयुक्त पदासाठी जोरदार स्पर्धा सुरू आहे. आयुक्तपदाच्या अखत्यारीतील बजेट हे वार्षिक ५०० कोटींचे आहे. त्यामुळे ही ‘मलाईदार’ खुर्ची कशी काबीज करता येईल, यासाठी काहींनी थेट आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांच्याकडे साकडे घातले आहे. या प्रकरणाच्या अनुषंगाने पुन्हा अमरावती येथे ‘नॉन आयएएस’ देण्याच्या वेगवान हालचाली सुरू झाल्याची माहिती पुढे आली आहे.

तत्कालीन अपर आयुक्त पी. प्रदीपचंद्रन यांची नाशिक येथील विभागीय अपर आयुक्त म्हणून बदली झाली आहे. परिणामी गत आठवड्यापासून ‘एटीसी’ पदावर विराजमान होण्यासाठी इच्छुकांनी लॉबिंग चालविली आहे. ही खुर्ची मिळविण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी असलेले काही वादग्रस्त अधिकारीदेखील स्पर्धेत आहेत. ज्यांनी यापूर्वी ‘एटीसी’ पदावर कार्यरत असताना वादग्रस्त निर्णय, चुकीच्या लोकांना कंत्राट, महिलांची प्रकरणे अशा विविध कारणांनी ही खुर्ची बदनाम केली आहे. आता हेच अधिकारी आदिवासी विकासमंत्र्यांना हाताशी धरून पुन्हा आदिवासी समाजाच्या हक्कांवर गदा आणण्याचे मनसुबे रचत आहेत. खुर्ची वादग्रस्तअमरावती एटीसीपद हे तसेही वादग्रस्त असतेच. मात्र, अगोदरच वादग्रस्त असलेले अधिकारी पदावर येताच मोर्चे, आंदोलनांना वाव मिळतो. अकोला, धारणी, किनवट, औरंगाबाद, कळमनुरी, पुसद, पांढरकवडा अशी सात एकात्मिक प्रकल्प कार्यालये या पदाशी संलग्न आहेत. आदिवासींसाठी योजना, विद्यार्थी शिक्षण, आश्रमशाळांचे नियोजन असे उपक्रम राबविले जातात. मात्र, आतापर्यंत अधिकारी, कंत्राटदार, पुरवठादार गब्बर झाल्याचे वास्तव आहे.हे आहेत इच्छुकअमरावती एटीसीपदासाठी नागपूरचे एटीसी संदीप राठोड, आदिवासी विकास विभागातील जात पडताळणी अधिकारी विनोद पाटील व मंत्रालयातील सहसचिव अशोक आत्राम यांच्यासह वनविभागातील दोन अधिकारीसुद्धा स्पर्धेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

‘आयएएस’ विरुद्ध ‘नॉन आयएएस’ अमरावती अपर आयुक्तपदी ‘नॉन आयएएस’ची वर्णी लागल्यास पुन्हा वाद पेटण्याची शक्यता आहे. कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी दोन वर्षांपूर्वी अमरावतीत एटीसी पदावर आयएएस अधिकारी देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानुसार पी. प्रदीपचंद्रन यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता पुन्हा एटीसी पदावर ‘नॉन आयएएस’ अधिकारी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

पुसद, पांढरकवडा, धारणी प्रकल्प अधिकारीपद रिक्तचअमरावती अपर आयुक्त कार्यालय अंतर्गत सात प्रकल्पांपैकी पुसद, पांढरकवडा व धारणी येथील प्रकल्प अधिकारी पदे रिक्त आहेत. धारणी येथे आयएएस अधिकारी योगेश कुंभेजकर यांची नियुक्ती झाली असली तरी ते अद्याप रुजू झाले नाहीत.

टॅग्स :Amravatiअमरावतीministerमंत्रीamravati-acअमरावती