शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

चांदूरबाजारात प्रहारचा कडकडीत बंद

By admin | Updated: January 8, 2017 00:14 IST

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहारतर्फे गुरुवारी करण्यात आलेल्या नांगर आंदोलनी पोलिसांनी गालबोट लावला.

निषेध आंदोलन : नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, चांदूरबाजार : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहारतर्फे गुरुवारी करण्यात आलेल्या नांगर आंदोलनी पोलिसांनी गालबोट लावला. त्यांना पांगविण्यासाठी कल्क्ट्रेटवर पोलिसांनी अमानुष लाठीमार, अश्रुधूर व पाण्याचा मारा करून शेतकऱ्यांवर अन्याय केला. तसेच आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांवर गंभीर गुन्हेही दाखल केले. यासाठी प्रहारकडून सरकार व पोलीस प्रशासनाच्या निषेधार्थ शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. ५ जानेवारीला अमरावतीला आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात झालेल्या नांदगर आंदोलनात सहभागी शेतकरी, महिला, कष्टकरी नागरिकांचा मोर्चा संपूर्ण शांततेने जात असताना सरकारी यंत्रणेकडून आंदोलन दडपून टाकण्याकरिता मोर्चात सहभागी झालेल्यांवर अमानुषपणे हल्लाच करण्यात आला. यात आबालवृद्ध व महिला मोठ्या प्रमाणात जखमी झाल्या. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या मागण्यांचे मुद्दे समजून न घेता ते दडपून टाकण्याचा हा अतिशय निंदनीय प्रकार असल्याचे प्रहारकडून लेखी निवेदनही तहसीलदारांमार्फत शासनाकडे सादर करण्यात आले.तहसीलदार शिल्पा बोबडे अनुपस्थित असल्यामुळे त्यांच्यावतीने प्रहारचे हे निवेदन निवाशी नायब तहसीलदार विजय गोहाड, निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार अर्जुन वांदे, नायब तहसीलदार अमित बनसोडे यांनी एकत्रितपणे स्वीकारले. हे निषेध आंदोलन यशस्वी करण्याकरिता सरदारखान, पवन वाट, मुजफ्फर हुसेन, शैलेश मेश्राम, शिशीर माकोडे, सतीश लोखंडे, बाल्या गाडे, सलीम सरकार, नितीन कोरडे, मुन्ना बोंडे, राजा खोडपे, इरफान शाह, विशाल बंड, सचिन खुळे, गणेश पुरोहीत, नीलेश ठाकरे, राजू राऊत, अनवरभाई, गोलू ठाकूर, नीलेश मेंढे, ऋषी श्रीवास, मो. अनिल शे. फारुक, हेमंत कोंडे, अकबरशहा, हारुनशाह, रोहीत मेंढे, नितीन खरड इत्यादी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)पोलिसांचा बंदोबस्तबंददरम्यान अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घेत पोलिसांनी शहरातील प्रत्येक चौकात तगडा बंदोबस्त लावला होता. जयस्तंभ चौक, नेताजी चौक, बेलोरा चौक, शिवाजी चौक व एसटी डेपोसमोर पोलीस तैनात करण्यात आले होते. या बंदोबस्तासाठी अचलपूर, परतवाडा, मोर्शी, खोलापूर, माहुली, आसेगाव, ब्राम्हणवाडा थडी, लोणी, शिरजगाव कसबा या सर्व पोलीस स्टेशनमधून एक अधिकारी व दहा शिपाई कर्मचारी तसेच अमरावती येथून दोन दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आले होते. शहरातील संपूर्ण स्थितीवर पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांच्या मार्गदर्शनाखाली अ‍ॅडीशनल एसपी मकानदार, एस. डी. पी. ओ. जयंत मीणा, ठाणेदार सदानंद मानकर तथा खुपीया भुवनेश्वर तायडे व प्रशांत भटकर जातीने लक्ष ठेवून होते.