आंदोलन : अध्यक्ष, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, सीईओंना निवेदनअमरावती : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी एस.एम पानझाडे यांना एका महिलेने थापड मारहाण केल्याप्रकरणी शुक्रवारी या घटनेचा निषेध करण्यासाठी झेडपीच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी निषेध मोर्चा काढला. या प्रकरणातील सर्व आरोपीवर कठोर कारवाई करावी व भविष्यात अशा घटना घडू नये, यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सतीश उईके, जिल्हाधिकारी किरण गित्ते, विभागीय आयुक्त ज्ञानेश्र्वर राजूरकर, मुख्यकार्यकारी अधिकारी सुनील पाटील आदींना निवेदनाव्दारे केली आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी एस.एम. पानझाडे हे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. त्यांनी शिक्षण विभागाच्या माध्यमातून अनेक उपक्रम सुरू केले आहेत. अशा प्रामाणिक अधिकाऱ्यांवर भ्याड हल्ला झाल्याचा प्रकरणाचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो, असे या निवेदनात म्हटले आहे. गुरूवारी जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या अॅन्टीचेंबर मध्ये दुपारी चर्चा करीत असताना रश्मी तिवारी नामक महिलेने चेंबर मध्ये घुसून शिक्षणाधिकारी पानझाडे यांना थापडा मारल्यात. ही घटना अतिशय निंदनीय आहे. अशा घटनेमुळे जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खचत आहे. त्यामुळे या घटनांना आळा घालण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, शिक्षणाधिकारी पानझाडे यांना पोलीस संरक्षण पुरविण्यात यावे, दोषी असलेल्या सर्व गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवेदनाव्दारे केली आहे. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके यांनी या घटनेचा निषेध केला आहे. जिल्हाधिकारी किरण गिते यांनी या सर्व प्रकरणाची चौकशी करून कारवाई केली जाईल आणि शिक्षणाधिकाऱ्यांना सुरक्षा पुरविण्याचे आश्वासन दिले. विभागागीय आयुक्त ज्ञानेश्र्वर राजूरकर यांनी या घटना निंदनीय असून अशा घटना रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन जिल्हा परिषदेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिले. यावेळी वित्त व मुख्य लेखा अधिकारी चंद्रशेखर खंडारे, डेप्युटी सीईओ कै लास घोडके, संजय इंगळे, प्रकाश तट्टे, जे.एन आभाळे, उन्मेश देशमुख, समाजकल्याण अधिकारी बी.के. चव्हाण कार्यकारी अभियंता अनिल जवंजाळ, प्रमोद पोटफोडे, के.टी उमाळकर, कृषी अधिकारी उदय काथोडे, प्रमोद कापडे, जिल्हा परिषद कर्मचारी युनयिनचे अध्यक्ष पकंज गुल्हाने, ज्ञानेश्र्वर घाटे, मंगेश मानकर, प्रशांत धर्माळे, श्रीकांत मेश्राम, निलेश तालन, रूपेश देशमुख, नितीन माहोेरे, संजय खारकर, प्रमोद ताडे, समीर चौधरी, संजय खडसे, प्रज्वल घोम, अमोल कावरे, ऋषिकेश कोकाटे, सुभाड बोडखे, अशोक तिनखेडे, राजेंद्र खैरनार, जयेश वरखेडे, गजानन पाचपोर, तारकेश्र्वर घोटेकर, मनीष पंचगाम, शिल्पा काळमेघ, अर्चना लाहूडकर, विलीन खडसे, देवेंद्र शिंदे, राजू मुळे, राजेश अडगोकार आदी उपस्थित होते.
शिक्षणाधिकाऱ्यांना मारहाणप्रकरणी निषेध मोर्चा
By admin | Updated: April 30, 2016 00:15 IST