अमरावती : डॉक्टर पत्नीला अपशब्दा बोलल्यावरून वाद उफाळला. यात तिघांनी संगनमताने डोक्यावर लोखंडी पाइपने मारून जखमी केल्याची घटना वर्षा कॉलनीत मंगळवारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी बुधवारी गुन्हा नोंदविला.
काशिनाथ वासनिक (५५),मयूर वासनिक (दोन्ही रा. यशोदानगर) व एका अनोळखी इसमाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला. फिर्यादी अंकित गजानन कावळे (२७, रा. न्यू कॉलनी) यांनी राजापेठ ठाण्यात तक्रार नोंदविली. फिर्यादी व आरोपी एकामेकांच्या ओळखीचे असून फिर्यादी मित्राच्या वाढदिवसाकरिता मित्राच्या घरी गेला असता, आरोपीने वाद घालून मारहाण केली. आरोपीविरुद्ध कलम ३२४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला.