आॅनलाईन लोकमतअमरावती : वनकर्मचाऱ्यांनी तांत्रिक कामांना नकार देत पुकारलेल्या कामबंद आंदोलनावर तोडगा निघाला नसल्यामुळे संपकरी वनकर्मचाऱ्यांनी बुधवारी कुटुंबीयांसह ठिय्या देत वरिष्ठ वनाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. मात्र, दुसरीकडे संपकरी कर्मचाऱ्यांना शोकॉज बजावण्यासाठी प्रादेशिक वनविभागदेखील सरसावला आहे.अकोट वन्यजीव विभागात तीन आणि गुगामल विभागातून चार वनकर्मचाऱ्यांवर निलंबनाची गाज कोसळली आहे. पुढच्या टप्प्यात सिपना वन्यजीव विभागातील कर्मचाऱ्यांचे निलंबन होईल, असे संकेत व्याघ्र प्रकल्पाने दिले आहे. संपावर तोडगा काढण्याऐवजी निलंबनाची कारवाई होत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये अधिकाºयांप्रती संताप वाढत आहे. दुसरीकडे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक एम. एस. रेड्डी यांनी जीपीएस यंत्र वनाधिकाऱ्यांनी स्वीकारावे. यापुढे जीपीएस कधीही परत करणार नाही, असे लेखी दिल्याशिवाय निलंबनाची कारवाई मागे नाही, अशी ठाम भूमिका वनपाल-वनरक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चेदरम्यान मंगळवारी घेतली. त्यामुळे बुधवारी सायंकाळपर्यंत वनकर्मचारी आपल्या कुटुंबीयांसह आंदोलनात सहभागी होते. संप मागे घेण्यासाठी वनाधिकाऱ्यांकडून संघटनेचे म्होरके लक्ष्य करून आतापर्यत निलंबन कारवाईने स्पष्ट होत आहे. आहआंदोलनात इंद्रजित बायस्कर, प्रदीप बाळापुरे, अनुप साबळे, राजेश घागरे, प्रवीण सगणे, डी.एम. पोटे, एन.डी. तुपकर, पी.बी. फरतोडे, एस.एस. खराबे, टी.ए. ठाकरे, एस.एच. राठोड, ए.जे. अलोकार, डी.एम. हेरो, एम.एम. ठाकरे, डी.एन. पवार, एस.बी.शेगोकार, एस.आर.काळे, एस.हच. मेटकर, ए.बी. वानखडे, ए.एस. मोरे, ए.जी. चक्रवर्ती, पी.पी. मुंडे, पी.एस. सोगे, व्ही.जी. बनसोड आदींचा सहभाग आहे.मुला-बाळांचीही वेतन वाढीसाठी हाकवनकर्मचाऱ्यांनी त्यांचे प्रश्न, न्यायिक मागणीसाठी कुटुंबीयांसह ठिय्या आंदोलन करून वरिष्ठांचे लक्ष वेधले. आंदोलनात सामील झालेल्या वनकर्मचाऱ्यांच्या मुला-बाळांनी ‘पगार वाढवा, पगार वाढवा, आमच्या पप्पाचा पगार वाढवा’ अशी आर्त हाक देत जोरदार घोषणा दिल्यात.
वनकर्मचाऱ्यांचे कुटुंबीयांसह ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 22:08 IST
वनकर्मचाऱ्यांनी तांत्रिक कामांना नकार देत पुकारलेल्या कामबंद आंदोलनावर तोडगा निघाला नसल्यामुळे संपकरी वनकर्मचाऱ्यांनी बुधवारी कुटुंबीयांसह ठिय्या देत वरिष्ठ वनाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.
वनकर्मचाऱ्यांचे कुटुंबीयांसह ठिय्या आंदोलन
ठळक मुद्देसंपकऱ्यांना बजावणार शोकॉज : वनाधिकाऱ्यांकडून संघटनेचे म्होरके लक्ष्य