शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शिरजगाव कसबा येथे तणावपूर्ण शांतता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 06:00 IST

पोलीस ठाण्याला भेट देऊन पोलीस निरीक्षक अशोक कांबळे व उपनिरीक्षक मंगेश डांगे यांच्याकडून गावातील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच दोन्ही संप्रदायातील निवडक प्रतिनिधींना बोलावून शांतता व सुव्यवस्थेसाठी चर्चा करण्यात आली.

ठळक मुद्देअपर पोलीस अधीक्षकांची भेट : पाच आरोपींना जामीन

लोकमत न्यूज नेटवर्कशिरजगाव कसबा : आर्थिक व्यवहारातून दोन व्यक्तींमध्ये झालेल्या हाणामारीमुळे दोन समुदायात तणाव निर्माण झाला. येथील आठवडी बाजार परिसरातील चहा विकणाऱ्या दुकानावर ३ डिसेंबर रोजी ही घटना घडली होती. दोन गट एकमेकांसमोर उभे ठाकल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला.जिल्ह्यातून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त बोलावण्यात आला. सध्या गावात शांततापूर्ण वातावरण असून परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांनी शिरजगाव कसबा गाठले.पोलीस ठाण्याला भेट देऊन पोलीस निरीक्षक अशोक कांबळे व उपनिरीक्षक मंगेश डांगे यांच्याकडून गावातील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच दोन्ही संप्रदायातील निवडक प्रतिनिधींना बोलावून शांतता व सुव्यवस्थेसाठी चर्चा करण्यात आली. या चर्चेला जि.प.चे माजी सभापती मनोहर सुने, बाळासाहेब सोनार, नाजिम बेग, मुक्तार कुरेशी, अश्फाक काजी व ओम कुऱ्हाडे उपस्थित होते. दोन्ही समाजात दुरावा निर्माण करणाऱ्या लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांनी दिली. घटनेत मध्यस्थी करणारे व गंभीर जखमी झालेले आसिम मो. सलीम तसेच यासीन कुरेशी यांच्यावर अमरावती येथे उपचार सुरू आहेत. दोन्ही गटांच्या तक्रारीवरून नीलेश दाभाडे, नवल बदुकले, शुभम अस्वार, गोलू मजीत पटेल, अब्दुल रहीस शेख हुसेन या आरोपींना अटक करून चांदूरबाजार न्यायालयात हजर करण्यात आले. व्यक्तिगत जामीन मंजूर करून सर्व आरोपींची गुरुवारी पोलीस कोठडीतून सुटका करण्यात आली.

टॅग्स :Policeपोलिस