शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

धारणीत आंतरधर्मीय विवाहामुळे तणाव

By admin | Updated: March 13, 2015 00:22 IST

येथील मुस्लिम युवक आणि हिंदू युवतीने प्रेमप्रकरणातून गुपचूप विवाह उरकल्याचे प्रकरण चिघळले आहे.

धारणी : येथील मुस्लिम युवक आणि हिंदू युवतीने प्रेमप्रकरणातून गुपचूप विवाह उरकल्याचे प्रकरण चिघळले आहे. त्यात युवकाने विवाहित असल्याचे लपवून खोट्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे हा विवाह केल्याने हिंदू समाजातील स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत. गुरूवारी युवकाच्या पहिल्या पत्नीने ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊन युवकाविरूध्द तक्रार नोंदविल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले असून दुसरीने मात्र यानंतरही युवकासोबतच राहण्याचा निर्धार पोलीस अधीक्षकांसमोर जाहीर केला. विस्तृत माहितीनुसार, धारणीतील होली चौकात मुस्लिम युवकाची मोबाईल शॉपी आहे. या युवकाचे नजीकच राहणाऱ्या एका प्रतिष्ठित हिंदू कुटुंबातील मुलीसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले.धारणी पोलिसांवर रोषधारणी : या दोघांनी गुपचूप अमरावती येथे मुस्लिम रिती-रिवाजाप्रमाणे विवाह देखील उरकला. यावेळी तरूणाने तो अविवाहित असल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले. वास्तविक त्याचा विवाह अमरावतीनजीकच्या बडनेरा येथील मुस्लिम तरूणीसोबत आधीच झाला आहे. त्यांचे प्रकरण न्यायालयात प्रविष्ट आहे. ही बाब काही दिवसांनी तरूणीच्या आई-वडिलांना समजली. सोमवारी त्यांनी याबाबत धारणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली व युवकावर कारवाई करण्याची मागणी केली. याप्रकरणात मुलाच्या आई-वडील व मामाविरूध्द कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली होती. मात्र, तक्रार देऊन तीन दिवस उलटल्यानंतरही पोलिसांनी कोणतीच हालचाली न केल्याने संतप्त झालेल्या हिंदू समुदायातील नागरिकांनी एक बैठक घेऊन पुन्हा बुधवारी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तसेच हा ‘लव्ह जेहाद’चा प्रकार असल्याने १३ मार्चपर्यंत कारवाई न झाल्यास १४ मार्चला चक्काजाम करण्याचा इशारा तक्रारीतून देण्यात आला आहे. या मागणीचे निवेदन हिंदू समुदायातील नागरिकांनी उपविभागीय अधिकाऱ्यांनाही दिले होते. दरम्यान तरूण-तरूणीने ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून आपली कैफीयत मांडली. त्यानंतर धारणी पोलिसांसह दोन्ही पक्षाच्या पालकांना आणि प्रतिष्ठितांनाही पोलीस अधीक्षक कार्यालयात पाचारण करण्यात आले. वृत्त लिहेपर्यंत दोन्ही पक्षांचे बयाण नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. हिंदू संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची मध्यस्थीहे प्रकरण ‘लव्ह जेहाद’चे असल्याची चर्चा रंगत असल्याने धारणीसह अमरावती येथील हिंदू संघटनांचे तसेच भाजपचे काही पदाधिकारीही एसपी कार्यालयात पोहोचले होते. त्यांनीदेखील याप्रकरणी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये धारणी भाजपच्या अध्यक्ष क्षमा चौकसे, शिवराय कुलकर्णी, सुरेखा लुंगारे, विजय शर्मा, सुधा तिवारी, किरण पातुरकर यांचा समावेश होता.