शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्रामीण आरोग्य यंत्रणा करा बळकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2022 05:00 IST

राज्यमंत्री कडू म्हणाले की, धारणी चिखलदराबरोबरच लगतच्या अचलपूर, चांदूर बाजार, अकोट येथील रुग्णालयांतही अद्ययावत तंत्रज्ञान प्रणाली विकसित करावी.  रुग्णालयांमध्ये डिजिटल कक्षाची उभारणी करण्यात यावी. तांत्रिकदृष्ट्या या कक्षात सर्व सुविधांची निर्मिती करण्यात यावी. सर्व तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधून दूरदृष्यप्रणालीद्वारे त्यांच्या उपलब्धतेच्या वेळापत्रकानुसार रुग्णांवर उपचार करावेत. याबाबतचे माहिती देणारे फलक रुग्णालयांमध्ये लावण्यात यावेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ग्रामीण भागातील नागरिकांना विशेषोपचार व कुशल तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान प्रणाली व यंत्रणेचा वापर करावा. धारणी व चिखलदरासारख्या  दुर्गम भागातील रुग्णालयांमध्ये टेलिमेडिसीन प्रणाली सुरळीत व नियमित करावी. तेथील नागरिकांना मुंबई, पुणे, नागपूर येथील तज्ज्ञ डॉक्टरांचे उपचार मिळवून द्यावेत, त्याचप्रमाणे प्रायोगिक तत्त्वावर ग्रामीण भागात टेलिमेडिसीन सेवा सुरु होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे निर्देश जलसंपदा व लाभक्षेत्र मंत्री बच्चू कडू यांनी दिले.जलसंपदा राज्यमंत्र्यांनी आरोग्य विभाग, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाचा आढावा मंगळवारी शासकीय विश्रामगृहात स्वतंत्र बैठकांद्वारे घेतला. त्यावेळी ते बोलत होते.  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, अचलपूर उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. सुरेंद्र ढोले, चिखलदरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय पवार, डॉ. रवींद्र चव्हाण, चुरणीचे वैद्यकीय अधीक्षक रामदेव वर्मा आदी उपस्थित होते.योग्य नियोजन करण्यात यावेराज्यमंत्री कडू म्हणाले की, धारणी चिखलदराबरोबरच लगतच्या अचलपूर, चांदूर बाजार, अकोट येथील रुग्णालयांतही अद्ययावत तंत्रज्ञान प्रणाली विकसित करावी.  रुग्णालयांमध्ये डिजिटल कक्षाची उभारणी करण्यात यावी. तांत्रिकदृष्ट्या या कक्षात सर्व सुविधांची निर्मिती करण्यात यावी. सर्व तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधून दूरदृष्यप्रणालीद्वारे त्यांच्या उपलब्धतेच्या वेळापत्रकानुसार रुग्णांवर उपचार करावेत. याबाबतचे माहिती देणारे फलक रुग्णालयांमध्ये लावण्यात यावेत. बालरोग, स्त्रीरोग, हृदयरोग, यकृत, मेंदू रोग, मानसिक आजार, जुनाट आजार आदी आजांरावर उपचार करण्याऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांना पाचारण करण्यात यावे. यासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधीची मदत घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले. टेलिमेडिसीन सेवा अव्याहत चालण्यासाठी इंटरनेट सेवा सुरळीत असणे आवश्यक आहे. तशी सुविधा उभारण्याचे निर्देश त्यांनी दिले. राज्यमंत्र्यांनी बांधकाम विभागाच्या विविध कामांचा आढावा घेतला.  

 

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूHealthआरोग्य