बेवारस श्वानांचा शहरात सुळसुळाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2020 05:00 AM2020-08-23T05:00:00+5:302020-08-23T05:00:02+5:30

रस्त्यावरून चालणाऱ्या महिला व लहान मुलांना सैरावैरा पळून आपला जीव वाचवावा लागत आहे. याबाबत पालिका प्रशासनाला अनेकदा तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. तसेच या सर्व प्रकाराबद्दल लोकप्रतिनिधीनासुद्धा माहिती असताना त्यांच्याकडूनसुद्धा दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांतर्फे केला जात आहे. परिसरातील लहान मुले या श्वानांच्या तावडीत सापडताच त्यांचे हे श्वान चावा घेतात.

Stray dogs roam the city | बेवारस श्वानांचा शहरात सुळसुळाट

बेवारस श्वानांचा शहरात सुळसुळाट

Next
ठळक मुद्देनागरिक त्रस्त। पालिका प्रशासनाने बंदोबस्त करणे गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर बाजार : स्थानिक नागरी वस्तीत मोठ्या प्रमाणात भटक्या श्वानांचा सुळसुळाट झाला आहे. झुंडा जवळून जाणारे नागरिक व लहान मुलांना या श्वानांपासून भीती निर्माण झाली आहे. आतापर्यंत तीन ते चार जणांना त्यांनी चावादेखील घेतल्याची माहिती आहे. या मोकाट श्वानांचा बंदोबस्त करण्यासाठी पालिका प्रशासनाकडे अनेकदा तक्रार केल्या. मात्र, तरीही पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.
शहरातील गल्लोगल्लीत मोकाट श्वानांचा वावर वाढला आहे. या श्वानची दहशत स्थानिक नागरिकांमध्ये पसरली असून, सामान्य नागरिकांचे रस्त्यावर फिरणे अडचणीचे झाले आहे. १० ते १२ बेवारस श्वानांचे टोळके प्रत्येक चौकात ठाण मांडून असतात. यामुळे परिसरातील नागरिकांना या श्वानांपासून मोठा धोका निर्माण झाला आहे. काही नागरिक आपल्या घरातील शिळे अन्न घराबाहेर टाकत असल्यामुळे हे श्वान मोठ्या प्रमाणात तुटून पडतात. त्यामुळे त्यांची दहशत वाढली असून, जवळून जाणाऱ्या-येणाऱ्या पादचाऱ्यांवर जोराने भुखत असतात.
रस्त्यावरून चालणाऱ्या महिला व लहान मुलांना सैरावैरा पळून आपला जीव वाचवावा लागत आहे. याबाबत पालिका प्रशासनाला अनेकदा तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. तसेच या सर्व प्रकाराबद्दल लोकप्रतिनिधीनासुद्धा माहिती असताना त्यांच्याकडूनसुद्धा दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांतर्फे केला जात आहे. परिसरातील लहान मुले या श्वानांच्या तावडीत सापडताच त्यांचे हे श्वान चावा घेतात. अनेकदा या श्वांनी पादचाऱ्यांचा व दुचाकीस्वारांच्या अंगावर धाव घेत पाटलाग केले केल्यामुळे अनेक अपघाताच्या घटना घडल्याने दुचाकीस्वार जखमी झाले आहेत. त्यामुळे शहरातील मोकाट श्वानांचे निर्बिजिकरणाची मागणी होत आहे.

भटक्या श्वानांची नसबंदी केव्हा?
भटक्या श्वानांची संख्या वाढू नये, यासाठी त्यांची नसबंदी करण्याचे पालिकेचे धोरण आहे. नगरविकास विभागाकडून तसे निर्देशही नगरपालिकेला प्राप्त झाले आहे. मात्र, मालिकेकडून त्यासाठी निश्चित असे धोरण बनविले गेले नाही किंवा भटके श्वान पकडून त्यांची निर्बिजीकरण शस्त्रक्रिया करण्यात आलेली नाही. शहरात भटक्या श्वानांनी हैदोस घातला असताना पालिकेचे हे अळीमिळी गुपचिळी धोरण संतापजनक ठरले आहे.

Web Title: Stray dogs roam the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :dogकुत्रा