शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

नवलच! अमरावती जिल्ह्यातील विद्यार्थ्याला मिळाले एका नोंदणीवर दोन आधार कार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 20:04 IST

मोर्शी तालुक्यातील अंबाडा येथील विद्यार्थ्याला दोन वेगवेगळ्या क्रमांकाचे आधार कार्ड घरपोच मिळाले आहेत. आधारसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी ‘युनिक’ असताना, हा प्रकार उघड झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ठळक मुद्देदोन्हींचे लिंक नाहीशासनाच्या योजनांपासून वंचित

गोपाल डाहाकेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मोर्शी तालुक्यातील अंबाडा येथील विद्यार्थ्याला दोन वेगवेगळ्या क्रमांकाचे आधार कार्ड घरपोच मिळाले आहेत. आधारसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी ‘युनिक’ असताना, हा प्रकार उघड झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.मोर्शी तालुका मुख्यालयापासून १२ किमी अंतरावरील अंबाडा येथे संचित वासुदेव वानखडे या सहा वर्षाच्या मुलाच्या घरी त्याचे वेगवेगळ्या क्रमांकाचे दोन आधार कार्ड पोहोचले आहेत. पहिल्या आधारवर ५७१७ ६०३४ ७२९१ हा क्रमांक आहे, तर दुसऱ्या आधारवर ७६५० ३८२६ २०६९ असा क्रमांक नमूद आहे. यामुळे शासकीय कामात कोणते आधार कार्ड वापरावे, असा प्रश्न त्याच्या पालकांना पडला आहे.

नोंदणी एकदाचसंचितची ३१ आॅगस्ट २०१६ रोजी मोर्शी येथील आठवडी बाजार परिसरातील सेतू केंद्रात आधार कार्डसाठी नोंदणी केली होती. बोटांचे ठसे, डोळ्यांचा रेटिना व अन्य आवश्यक माहिती केवळ एकदाच नोंदविण्यात आली. यावेळी त्याच्यासोबत आईवडील होते.

नामांकन दोनदाआधारसाठी नोंदणी करतेवेळी दोनवेळा नामांकन प्राप्त झाले. पहिले नामांकन क्रमांक २०३४/३०५२३/००८६८, तर दुसरे २०३४/३०५२३/००८६७ असे होते. आधार कार्ड एकच मिळेल, असे सांगितले गेल्याने संचिंतच्या पालकांनी फारसे मनावर घेतले नाही. यानंतर मुलाचे दोन कार्ड घरी आले.स्कॉलरशिप, बँक खाते नाहीसंचित अंबाडा येथील जिल्हा परिषद शाळेत पहिल्या वर्गाचा विद्यार्थी आहे. त्याच्या पालकांनी अनुसूचित जाती प्रवर्गातील शिष्यवृत्तीकरिता अर्ज केला. मात्र, त्याचे दोन्ही आधार क्रमांक बायोमेट्रिक पद्धतीने लिंक होत नाहीत. बँक खातेदेखील ते ऊघडू शकले नाही.एनआयसीने ठरवून दिलेल्या आधार केंद्राला मदत करणे, जास्तीत जास्त आधार कार्ड बनविणे व देखरेख ठेवणे ही कामे आमच्याकडे आहेत. तांत्रिकदृष्ट्या बायोमेट्रिकबद्दल माहिती आमच्याकडे नाही; जिल्हास्तरावरून ती माहिती मिळू शकेल.- अनिरुद्ध बक्षी, तहसीलदार, मोर्शी

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड