शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

लघुशंकेला रस्त्याच्या कडेला थांबला अन् लुटला गेला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2022 22:06 IST

Amravati News निर्जन स्थळ बघून लघुशंकेसाठी दुचाकीहून उतरलेल्या तरूणाला लुटण्यात आले. २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.३० च्या सुमारास नविन बायपासवरील जुना टोलनाका भागात ही घटना घडली.

ठळक मुद्देमोबाईल, अंगठी लांबविली

अमरावतीः  निर्जन स्थळ बघून लघुशंकेसाठी दुचाकीहून उतरलेल्या तरूणाला लुटण्यात आले. २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.३० च्या सुमारास नविन बायपासवरील जुना टोलनाका भागात ही घटना घडली. याप्रकरणी त्या १९ वर्षीय तरूणाच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी २९ ऑगस्ट रोजी अनोळखी तिघांविरूद्ध गुन्हा दाखल केला.

             मुर्तिजापूर तालुक्यातील राजुरा घाटे येथील मुळ रहिवासी तथा येथील राजापेठ भागात भाडेकरू असलेला निशांत घाटे (१९) हा २८ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबवून लघुशंकेकरीता थांबला. नविन बायपासवरील जुना टोलनाका भागात त्यावेळी तिघेजण बसले होते. निशांतला एकटे पाहून ते तिघेजण विनाकारण शिविगाळ करू लागले. निशांतने त्यांना शिविगाळ करू नका, असे बजावले असता एक काळी टी शर्ट घातलेला इसमाने निशांतचे खिसे तपासले. डोक्यात टोपी घातलेला, हिंदीत बोलणारा तो तरूण सुमारे २१ वर्षांचा होता. खिसे तपासण्यास विरोध केला असता दुस-या लाल पांढ-या रंगाची टीशर्ट घातलेल्या इसमाने निशांतला झापड मारली. तथा त्याच्या हातातील मोबाइल हिसकावला. तसेच तिस-या मुलाने निशांतच्या खिशातून ३ ग्राम सोन्याची अंगठी काढून घेतली. ते इसम विना क्रमांकाच्या दुचाकीने अकोलाकडे पळुन गेले. तीन अनोळखी इसमांनी आपल्याला रोखून, मारहाण करून लुटल्याची तक्रार निशांतने नोंदविली. पहाटे २.३६ च्या सुमारास तीन अज्ञातांविरूद्ध कलम ३९४, ५०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. 

त्याच स्पाॅटवर पुन्हा लूटनिशांत घाटे याला लुटल्यानंतर जुना जकात नाक्याजवळ पुन्हा एका दुचाकीस्वाराला चाकुचा धाक दाखवून लुटण्यात आल्याची घटना घडली. २८ ऑगस्ट रोजी रात्री ९ च्या सुमारास सौरभ वाहुरवाघ (१९, कारंजा लाड) हा दुचाकीने कारंजाकडे जात असताना जुन्या जकात नाक्याजवळ एकाने त्याला हात दाखवून थांबविले. थांबताच एका २२ ते २३ वर्षे वयोगटातील तरूणाने त्याला कानावर बुक्की मारली. समोरून आलेल्या दोन तरूणांनी देखील त्याला मारहाण केली. त्यातील एका मुलाने चाकुचा धाक दाखवून सौरभकडील दोन मोबाईल, हेडफोन लुटला. नंतर तिघेेही आरोपी जंगलाच्या दिशेने निघून गेले. याप्रकरणी २९ ऑगस्ट रोजी पहाटे ३.४० च्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी