शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मंगल कार्यालयात कपडे बदलणाऱ्या मुलीचा चोरून काढला व्हिडिओ; नातेवाईकांनी धू धू धुतले!

By प्रदीप भाकरे | Updated: June 8, 2023 17:36 IST

Amravati News मंगल कार्यालयातील एका खोलीत कपडे बदलवित असलेल्या मुलींचा चोरून व्हिडीओ काढणाऱ्या रोडरोमियोला वऱ्हाड्यांनी जाम धुतले.

प्रदीप भाकरेअमरावती: मंगल कार्यालयातील एका खोलीत कपडे बदलवित असलेल्या मुलींचा चोरून व्हिडीओ काढणाऱ्या रोडरोमियोला वऱ्हाड्यांनी जाम धुतले. अंजनगाव सुर्जी येथील एका मंगल कार्यालयात ७ जून रोजी रात्री ८ ते ८.१५ च्या सुमारास हा प्रकार घडला. चोप देऊन त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. मोहम्मद फुजेल मो. शौकत (२३, रा. काजीपुरा, इमाम चौक, अंजनगाव सुर्जी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

             तक्रारीनुसार, ७ जून रोजी रात्री अंजनगाव सुर्जी तालुक्यातील एका प्रतिष्ठित कुटुंबातील मुलीचा लग्नसमारंभ तेथीलच एका मंगल कार्यालयात आयोजला होता. वर-वधूंकडील शेकडो वऱ्हाडी त्यात सहभागी झाले. त्यात फिर्यादी महिलेच्या घरातील मुली देखील सहभागी झाल्या होत्या. बुधवारी रात्री आठच्या सुमारास त्या मुली मंगल कार्यालयातील एका खोलीत तयार होत होत्या. त्यावेळी एका तरूणाने खिडकीतून चोरून त्या मुलींचा कपडे बदलवित असतानाच व्हिडिओ रेकार्ड केला. तो करीत असताना दोन तीन वऱ्हाड्यांनी त्याला पाहिले. जाब विचारला. त्याने आधी उडवाउडवीचे उत्तरे दिली. मात्र, काही तरूणांनी त्याचा मोबाईल तपासला असता त्यात क्षणभरापूर्वी केलेल्या मुलींची रेकार्डिंग दिसून आली. ते कळताच मंगल कार्यालयात हलकल्लोळ उडाला. अनेकांनी त्या तरूणाला बेदम चोप दिला. पोलिसी खाक्या बसताच सांगितले नावआरोपी तरूणाने मार बसल्यानंतरही मी तो नव्हेच चा पवित्रा कायम ठेवला. मात्र, पोलिसी खाक्या बसताच त्याने स्वत:ची ओळख मोहम्मद फुजेल मो. शौकत अशी सांगितली. त्याच्याकडून तीन मोबाईलदेखील जप्त करण्यात आले. पाठोपाठ आरोपीने ज्या मुलींचे कपडे बदलवित असताना रेकार्डिंग केले, त्या मुलींशी संंबंधित असलेली ५२ वर्षीय महिला अंजनगाव पोलीस ठाण्यात पोहोचली. आरोपीविरूध्द ७ जून रोजी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी