शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

खारपाणपट्टयाला ‘टॉनिक’

By admin | Updated: February 10, 2017 00:07 IST

जिल्ह्यात पाच तालुक्यातील ३५५ गावांमधील १ लाख ६० हजार २०७ हेक्टरमधील खारपाणपट्ट्याचा लवकरच जागतिक बॅँकेच्या साहाय्याने कायापालट होणार आहे.

शेतकऱ्यांच्या सूचना : जागतिक बॅँकेच्या पथकाद्वारे पाहणी अमरावती : जिल्ह्यात पाच तालुक्यातील ३५५ गावांमधील १ लाख ६० हजार २०७ हेक्टरमधील खारपाणपट्ट्याचा लवकरच जागतिक बॅँकेच्या साहाय्याने कायापालट होणार आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत यापरिसरातील शेतीचा शाश्वत विकास करण्यासाठी जागतिक बॅँकेची चमू व कृषी विभागाच्या पथकाद्वारा बुधवारी दर्यापूर तालुक्यामधील काही गावांची पाहणी करण्यात आली. राज्यातील १५ अवर्षणग्रस्त जिल्हे व खारपाणपट्ट्यात हा कृषीसंजीवनी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. जागतिक बॅँकेचे २८०० कोटी व राज्य शासनाचा वाटा १२०० कोटी असा एकूण ४ हजार कोटींचा निधी शासन उपलब्ध करून देणार आहे. यामध्ये अमरावती जिल्हाच्या वाट्याला किमान एक हजार कोटी रूपये मिळण्याची अपेक्षा पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी व्यक्त केली. यासाठी ११ जानेवारीलो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृह मुंबई येथे पालकमंत्री प्रवीण पोटे, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, राज्यमंत्री मदन येरावार, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्यासह माजीमंत्री एकनाथ खडसे व संबंधित जिल्ह्याचे आमदार उपस्थित होते. यापथकाने वाशिम व अमरावती जिल्ह्यातील काही गावांची पाहणी केली. खारपाणपट्ट्यात शाश्वत उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करण्यासाठी जागतिक बॅँक राज्यातील ५ हजार गावात विविध उपाययोजना राबविणार आहे. जागतिक बँकेने खारपाणपट्ट्याचा कायापालट करण्यासाठी हा प्रकल्प ‘फास्ट ट्रॅक’ घेतला आहे. येत्या चार महिन्यात याप्रकल्पाचे काम सुरु होणार आहे. यासाठी राज्यात सध्या सुरु असणाऱ्या अनेक कृषीयोजना एकत्रित करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील तीन वर्षात यागावांमध्ये दृश्य स्वरुपात बदल दिसण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. या जिल्ह्यात राबविणार प्रकल्प नानाजी देशमुख कृषीसंजीवनी प्रकल्प व राज्यातील अमरावती, जळगांव, औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वर्धा, वाशिम, यवतमाळ, नांदेड व लातूर अशा १५ जिल्ह्यातील तालुक्यामधील ५ हजार गावांत जागतिक बॅँकेच्या अर्थसहाय्याने राबविण्यात येणार आहे. खारपाणपट्ट्याच्या मुलभूत विकासासाठी जागतिक बॅँकेच्या सहाय्याने हा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. यापथकाशी विस्ताराने चर्चा करण्यात आली. याप्रकल्पाने खारपाणपट्ट्याचा लवकरच दृश्यस्वरुपात विकास होईल, अशी माझी खात्री आहे. - अरविंद नळकांडे, शेतीअभ्यासक (खारपाणक्षेत्र) हवामान घटकामुळे शेतीवर दूरगामी परिणाम वाढत्या तापमानामुळे पीकउत्पादकतेवर विशेषत: कोरडवाहू पिकावर विपरित परिणाम होते. याक्षेत्रात अनियमित पावसामुळे पीकउत्पादनांवर परिणाम होऊन जमिनीची धूप होते. वाढत्या तापमानामुळे जमिनीतील कर्बामध्ये घट होऊन उत्पादकतेमध्ये घट होते. जमिनीतील ओलाव्यात कमी येते. ही आहेत प्रकल्पाची वैशिष्ट्येहवामान बदलास अनुसरुन कृषीपद्धती विकसित करणे, शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी कृषीमूल्य साखळीमध्ये त्यांचा सहभाग वाढविणे, शास्त्रीय निर्देशांकाचा वापर करुन प्रकल्पांतर्गत समूहपद्धतीने गावांची निवड करणे,शेतकऱ्यांना कृषी हवामानाचा सल्ला देणे व शिवारातील पाण्याचे ताळेबंदानुसार पीकनियोजन करणे.