शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
3
'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान
4
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
5
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
6
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
7
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
8
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
9
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
10
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
11
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
12
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
13
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान
14
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
15
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
16
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
17
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता
18
मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन
19
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
20
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन

स्टेशन मास्टरचा फ्लॅट फोडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 10:36 PM

बडनेरा हद्दीतील निंभोरा स्थित मीनाक्षी अपार्टमेंटला चोरट्यांनी लक्ष्य केले. स्टेशन मास्टरचा फ्लॅट फोडून मुद्देमाल लंपास केला. विशेष म्हणजे, चोरांनी अन्य फ्लॅटचे बाहेरून दार लावल्याने नागरिकांची चांगलीच पंचाईत झाली होती. सदर कुटुंब बाहेरगावी असल्याने किती मुद्देमाल लंपास केला, ही बाब स्पष्ट झाली नाही.

ठळक मुद्देनिंभोरा येथील घटना : इतर दरवाजे घेतले बाहेरून लावून

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बडनेरा हद्दीतील निंभोरा स्थित मीनाक्षी अपार्टमेंटला चोरट्यांनी लक्ष्य केले. स्टेशन मास्टरचा फ्लॅट फोडून मुद्देमाल लंपास केला. विशेष म्हणजे, चोरांनी अन्य फ्लॅटचे बाहेरून दार लावल्याने नागरिकांची चांगलीच पंचाईत झाली होती. सदर कुटुंब बाहेरगावी असल्याने किती मुद्देमाल लंपास केला, ही बाब स्पष्ट झाली नाही.निंभोरा खुर्द स्थित विजयपथनगर येथील मीनाक्षी अपार्टमेंटला चोरांनी शनिवारी लक्ष्य केले. सकाळी तेथील रहिवासी राहुल ढोक यांना फ्लॅटचे दार बाहेरून बंद असल्याचे आढळून आले. त्यांनी शेजाऱ्यांना फोन करून दार उघडण्यास सांगितले. यानंतर पाहणी केली असता, त्यांना स्टेशन मास्टर प्रदीप तामगाडगे यांच्या फ्लॅटचा कडीकोंडा तुटलेला दिसला. त्यांनी अन्य फ्लॅटची पाहणी केली असता, अजय तितरे यांच्याही फ्लॅटचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी प्रदीप तामगाडगे यांच्या फ्लॅटमध्ये शिरून पाहणी केली असता, घरातील साहित्य अस्ताव्यस्त केले होते. त्यामुळे चोरी झाल्याचे लक्षात आले. ढोक यांनी या घटनेची माहिती तळमजल्यावर राहणारे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत लभाने यांना दिली. त्यांनी बडनेरा पोलिसांना घटनास्थळी बोलाविले. तामगाडगे कुटुंबीय गोव्याला आहे. बडनेरा ठाण्याचे उपनिरीक्षक अफुने ताफ्यासह घटनास्थळी पोहोचल्या. कल्पेश मेंढे यांनी बडनेरा पोलिसांत तक्रार नोंदविली.स्कूल आॅफ स्कॉलर्सच्या मागील परिसरात मीनाक्षी अपार्टमेंट असून, शेजारीच जंगलाचा भाग आहे. या ठिकाणी अनेक टवाळखोरांचा ठिय्या आहे. विजयपथ कॉलनीतील पथदिवे सुध्दा अनेक दिवसांपासून बंद आहे. ते पथदिवे फोडण्यात आले आहेत.फ्लॅटमध्ये राहतात दोन पोलीस अधिकारीमीनाक्षी अपार्टमेंटमध्ये १० फ्लॅट असून, त्यापैकी दोन फ्लॅटमध्ये पोलीस उपनिरीक्षक राहतात. शुक्रवारी रात्री सर्व कुटुंबीय आपआपल्या घरी असताना चोरांनी हा डाव साधला. मात्र, चोरीची भनक कोणाला लागली नाही. सकाळी उठल्यानंतर बाहेरून दार असल्यामुळे सर्वांची ताराबंळ उडाली होती.