शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
2
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...
3
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
4
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
5
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
6
'माझ्या बायकोला तू पळवून लावलंस!'; रागाच्या भरात भावाने बहिणीची केली निर्घृण हत्या
7
"लग्न नाही, फॅमिली नाही विचार करा...", फुकटचा सल्ला देणाऱ्या चाहत्याला जुईचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "अशा माणसांची..."
8
नवरात्रीतील विनायक चतुर्थी २०२५: 'या' ८ राशींसाठी जुळून आले ३ महाशुभ योग; मिळेल विशेष धनलाभ!
9
मुलाला तुरुंगवास, धक्का बसलेल्या वडिलांनी संपवलं जीवन, अंत्यसंस्कारावेळी घडलं असं काही, ७ पोलीस निलंबित
10
पाकिस्तान युद्धात सैनिक लढला होता, नंतर पेन्शनशिवाय काढून टाकले; पत्नीला ५७ वर्षांनंतर मिळाला न्याय
11
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
12
Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु!
13
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
14
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
15
एकाच वेळी पाच-सहा मराठी सिनेमे रिलीज, कसं व्हायचं? प्रसिद्ध गायकाने मांडलं मत, इंडस्ट्रीबद्दल म्हणाला...
16
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
17
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
18
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
19
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
20
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू

जीएसटीचे काऊंटडाऊन सुरू

By admin | Updated: June 17, 2017 00:09 IST

येत्या १ जुलैपासून संपूर्ण देशभरात ‘जीएसटी’ कर प्रणाली कार्यान्वित होणार आहे. केंद्र सरकारने जीएसटी नोंदणीसाठी १ ते १५ जून दरम्यान सुविधा उपलब्ध करून दिली होती, ती मुदत गुरुवारी संपुष्टात आली.

१ जुलैपासून नवीन करप्रणाली : व्यावसायिकांमध्ये उत्सुकतालोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येत्या १ जुलैपासून संपूर्ण देशभरात ‘जीएसटी’ कर प्रणाली कार्यान्वित होणार आहे. केंद्र सरकारने जीएसटी नोंदणीसाठी १ ते १५ जून दरम्यान सुविधा उपलब्ध करून दिली होती, ती मुदत गुरुवारी संपुष्टात आली. यापूर्वी नोंदणीची अंतिम मुदत ३० एप्रिल होती. मात्र, या कालावधीत केवळ ६५ टक्केच व्यावसायिकांनी नोंदणी केली. त्यामुळे १५ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. ती संपुष्टात आल्यानंतर आता नव्याने २५ जून ते १ जुलैपर्यंत आॅनलाईन नोंदणी उपलब्ध राहील. गुरुवारी आॅनलाईन नोंदणीची मुदत संपत असताना ‘डू नॉट पॅनिक’असा संदेश जीएसटीच्या संकेतस्थळावर झळकला आहे. त्यात २५ जून ते १ जुलैपर्यंत आॅनलाईन नोंदणी करता येणार असल्याचे म्हटले आहे.नोंदणी न केल्यास इनपुट क्रेडिट आणि व्हॅट रिफंडचा लाभ घेता येणार नाही. जीएसटीची अंमलबजावणी झाल्यानंतर सध्याा अस्तित्वात असणारा विक्रीकर, उत्पादन शुल्क, प्रवेश कर, मनोरंजन कर, सेवाकर आणि व्हॅट (मूल्यवर्धीत कर) आदी कर संपुष्टात येणार आहेत. त्यामुळे व्यावसायिकांना १५ जूनपर्यंत जीएसटीच्या पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. व्यापारी आणि व्यावसायिकांनी ६६६.२३.ॅङ्म५.्रल्ल येथे नोंदणी करावयाची आहे. व्यापारी व व्यावसायिकांना आपले युजर नेम (प्रोव्हीजनल आयडी) आणि पासवर्ड घ्यावा लागेल. प्रोव्हीजनल आयडी आणि पासवर्ड राज्य व्हॅट, केंद्रीय उत्पादन शुल्क आणि सेवा कर संस्थेकडून घ्यावा लागेल.प्रक्रिया आॅनलाईनसध्या करदाते असणाऱ्यांना यापूर्वी मिळालेले प्रोव्हीजनल जीएसटीएन (गुडस् अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन) क्रमांक नोंदवावे लागतील. जीएसटीएन क्रमांकाला प्रोव्हिजनल आयडी असेही म्हटले जाते.नोंदणी करताना मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी द्यावा लागणार आहे.मोबाईल क्रमांकावर ओटीपी पाठविण्यात येईल.संबंधितांना आपली माहिती आणि स्कॅन केलेला फोटो अपलोड करावा लागेल.पॅन कार्ड, बँक खाते आणि आयएफसी क्रमांक आदींचाही अंतर्भाव करावा लागेल.ही सर्व माहिती आॅनलाईन भरण्याची आवश्यकता आहे.त्यानंतर संबंधिताचा नोंदणीकृत ई-मेल आणि मोबाईल क्रमांकावर नोंदणीची माहिती येईल.‘एससीईएस’चीही नोंदणी आवश्यकजीएसटीच्या वेबसाईटवर नोंदणी केल्यानंतर युजर नेम आणि पासवर्ड सेंट्रल एक्साईज अँड सर्व्हीस टॅक्सच्या (एससीईएस) ँ३३स्र://६६६.ंूी२.ॅङ्म५.्रल्ल या वेबसाईटवर नोंदवणे आवश्यक आहे. येथे व्यापारी आणि व्यावसायिकांनी कर विवरणपत्र जमा करता येणार आहे.केंद्रीय जीएसटी आणि राज्याच्या जीएसटीसाठी एकच नोंदणी क्रमांक असेल.जीएसटी नोंदणी न केल्यास...जीएसटी नोंदणी न केल्यास व्यापारी आणि व्यावसायिकांना व्हॅट व्यवस्थेतील टॅक्स क्रेडिट, इनपूट क्रेडिट आदींचे लाभ मिळणार नाहीत.व्हॅट परतावा मिळणार नाही.विवरणपत्र जमा करताना आधी जीएसटी नोंदणी करणे अनिवार्य आहे. नोंदणी न करता कर विवरण पत्र भरता येणार नाही.अकाऊंटिंग आणि सिस्टीमला करदात्यांसमवेत जोडून घ्या. सरकार त्यासाठी अ‍ॅप आणि सॉफ्टवेअरही आणणार आहे. व्यावसायिक अ‍ॅप आणि सॉफ्टवेअर डाऊनलोड करू शकणार आहेत