शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

नाफेड खरेदीसाठी तत्काळ आॅनलाईन नोंदणी सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 22:11 IST

यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात नाफेडच्यावतीने मूग, उडीद व सोयाबीनची खरेदी हमीभावाने करण्यात येणार आहे. यासाठी आॅनलाइन नोंदणी करण्याच्या सूचना शेतकऱ्यांना २२ सप्टेंबरला देण्यात आल्यात. प्रत्यक्षात नोंदणी पोर्टल बंद असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने जनदरबारात मांडले. पालकमंत्री व सहकार आयुक्तांनी याची गंभीर दखल घेऊन जिल्ह्यात तात्काळ आॅनलाइन नोंदणी सुरू करण्याच्या सूचना सोमवारी जिल्हा उपनिबंधक व डीएमओ यांना दिल्या.

ठळक मुद्देसहकार आयुक्तांचे आदेश : जिल्हा उपनिबंधकांनी लक्ष घालण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात नाफेडच्यावतीने मूग, उडीद व सोयाबीनची खरेदी हमीभावाने करण्यात येणार आहे. यासाठी आॅनलाइन नोंदणी करण्याच्या सूचना शेतकऱ्यांना २२ सप्टेंबरला देण्यात आल्यात. प्रत्यक्षात नोंदणी पोर्टल बंद असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने जनदरबारात मांडले. पालकमंत्री व सहकार आयुक्तांनी याची गंभीर दखल घेऊन जिल्ह्यात तात्काळ आॅनलाइन नोंदणी सुरू करण्याच्या सूचना सोमवारी जिल्हा उपनिबंधक व डीएमओ यांना दिल्या.राज्याचे सहकार आयुक्त सतीश सोनी सोमवारी जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात कर्जमाफी व नाफेड खरेदीसंदर्भात त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी नाफेडसाठी आॅनलाइन नोंदणी बंद असल्याबाबत ‘लोकमत’चे वृत्त जिल्हाधिकारी अभिजित बांगर व सहकार आयुक्त सतीश सोनी यांना दाखविले असता, त्यांनी याबाबत तात्काळ जिल्हा विपणन अधिकारी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना बोलाविले व आॅनलाइन नोंदणी बंद का, याची विचारणा केली. खरेदीसाठी सबएजंट संस्थांचे प्रस्ताव तात्काळ पाठवा व आजच आॅनलाइन नोंदणी सुरू करा, असे निर्देश दिलेत. यावेळी उपस्थित जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांना सूचना करून त्यांनीदेखील या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदविण्याची सूचना केली.यंदाच्या खरीप हंगामासाठी केंद्र शासनाद्वारे मूग पिकाची आधारभूत किंमत ६,९७५ व उडीद ५,६०० रुपये आहे. या दोन्ही पिकांसाठी नोंदणी ९ आॅक्टोबरपर्यंत करता येईल, तर सोयाबीनचा आधारभूत दर ३,३९९ असून, या पिकासाठी नोंदणी १ ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत करता येणार असल्याच्या सूचना शासनाच्या सहकार व पणन विभागाच्यावतीने देण्यात आल्यात.शेतकºयांनी संबंधित ‘एनईएमएल’ या पोर्टलवर नोंदणीसाठी प्रयत्न केला असता, हे पोर्टलच बंद असल्याची बाब ‘लोकमत’ने लावून धरली होती. शासनाची पूर्वतयारीच नसल्यामुळे शेतकऱ्यांना अकारण हेलपाटे घ्यावे लागत असल्याचे वास्तवादी चित्र मांडल्याची सहकार आयुक्तांनी गंभीर दखल घेतली.जिल्ह्यास विपणन अधिकारीच नाहीजिल्हा विपणन अधिकारी रमेश पाटील हे २९ सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांचा प्रभार तालुका सहायक निबंधकांकडे देण्याचे निर्देश जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी दिले असले तरी अद्याप या पदावर एआर रुजू झालेले नाही. त्यामुळे प्रक्रिया मंदावली आहे. आता नाफेड खरेदी तसेच आॅनलाइन नोंदणी सुरू करायची आहे. मात्र, संबंधित अधिकारी नसल्यानेच कामे खोळंबणार असल्याचे वास्तव आहे.लॉग-इन नाही; कशी होणार नोंदणी?मूग, उडीद व सोयाबीनची खरेदी करण्यासाठी शासनाने ‘अ’ वर्ग सभासद संस्थांचे प्रस्ताव मागितले आहे. त्यानुसार दाखल प्रस्ताव जिल्हा विपणन अधिकाऱ्यांनी प्रधान कार्यालयास पाठविले. याबाबतची निश्चिती व्हायची असल्यामुळे शेतमालाची नोंदणी करावयाचे ‘एनईएमएल’ हे पोर्टल बंद आहे. सबएंजट संस्थाचे प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर त्यांना प्रधान कार्यालयाद्वारा ‘आयडी’ देण्यात आल्यानंतरच आॅनलाइन नोंदणी सुरू होणार आहे. आता प्रस्ताव सादर करण्यासाठी धावपळ सुरू आहे. यामध्ये डीएमओ यांचे पाच, तर व्हीसीएमएफचे तीन अशा आठ केंद्रांवर खरेदी होण्याची शक्यता आहे.तूर, उडीद, सोयाबीन आदींची खरेदी करण्यासाठी एमईएमएल पोर्टल व हमीभाव खरेदी केंद्र त्वरित सुरू करण्याचे आदेश आज सहकार आयुक्त सतीश सोनी यांना दिले आहेत. एफपीओलासुद्धा खरेदी केंद्र सुरू करता येईल.- प्रवीण पोटे, पालकमंत्री, अमरावती