शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

जंगलातील वनवणवा नियंत्रणास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 06:00 IST

फेब्रुवारी महिन्यातच सूर्य अधिक तापू लागला आहे. दरवर्षी जंगलांना आगी लागण्याचा घटना घडतात. मात्र, गत १० वर्षांत वनवणव्यामुळे ठरावीक भागातील जंगलक्षेत्रांना लागणाऱ्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार केलेला आहे. विभागातील वनकर्मचाºयांची १० फेब्रुवारी रोजी मार्डी मार्गालगत मासोद येथील फुलपाखरू उद्यानात वनवणवा नियंत्रण व नियोजनाबाबत कार्यशाळा पार पडली.

ठळक मुद्देवनकर्मचाऱ्यांना ‘जागते रहो’चे आदेश : विभागस्तरावर स्वतंत्र कक्ष स्थापन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वनक्षेत्र अथवा जंगलातील वनवणवा नियंत्रणास रविवार, १६ फेब्रुवारीपासून प्रारंभ झाले आहे. वनकर्मचाऱ्यांना ‘जागते रहो’च्या सूचना देण्यात आल्या असून, वन बीटनिहाय आग नियंत्रणासाठी जबाबदारी निश्चित केली आहे. जंगलात कृत्रिम आग लागल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित वनकर्मचारी, अधिकारी कारवाईचे लक्ष्य असेल. विभागस्तरावर वनवणवा संरक्षण चमूंचे कक्ष स्थापन केले जाणार आहे.फेब्रुवारी महिन्यातच सूर्य अधिक तापू लागला आहे. दरवर्षी जंगलांना आगी लागण्याचा घटना घडतात. मात्र, गत १० वर्षांत वनवणव्यामुळे ठरावीक भागातील जंगलक्षेत्रांना लागणाऱ्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार केलेला आहे. विभागातील वनकर्मचाºयांची १० फेब्रुवारी रोजी मार्डी मार्गालगत मासोद येथील फुलपाखरू उद्यानात वनवणवा नियंत्रण व नियोजनाबाबत कार्यशाळा पार पडली. यात मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण, उपवनसंरक्षक गजेंद्र नरवणे, विभागीय वनाधिकारी हरिचंद्र वाघमोडे आदींनी कर्मचाऱ्यांना वनवणवा नियंत्रणासाठी टिप्स दिल्यात. १५ जानेवारी ते १३ फेब्रुवारी दरम्यान जंगलात जाळ रेषा तयार करणे, आगीवर नियंत्रणासाठी ब्लोअर मशीन, ग्रास कटर, अग्निरक्षकांची नेमणूक झाली. व्याघ्र प्रकल्पासह राखीव वने, प्रादेशिक वन विभागाचे जंगलाच्या वनवणव्यावर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश आहे.वनवणवा नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. पुरेसा कर्मचारी वर्ग, साहित्य, नियंत्रण कक्ष आणि वनवणवा स्थळांवर सूक्ष्म लक्ष आहे. वनवणवा नियंत्रणास प्रारंभ झाला.- गजेंद्र नरवणे, उपवनसंरक्षक, अमरावती

टॅग्स :forestजंगलfireआग