कामाला पण तकलादू पणा कायम.!
(लोकमत इम्पॅक्ट)
फोटो पी २० मोझरी
गुरुकुंज(मोझरी):- अमित कांडलकर
आठ दिवसांपूर्वी नव्याने डांबरीकरण केलेल्या रस्त्यावरील खड्डे चक्क गिट्टी अन मुरुमाच्या साहाय्याने पावसाळ्यात दुरुस्त करणारा नवखा प्रकार राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जन्मभूमी पासून कर्मभूमीला जोडणाऱ्या तेरा किलोमीटर रस्त्यावर पाहायला मिळतो. कमिशन खोरीमुळे कामात कुचराई करणारी प्रशासकीय यंत्रणा किती निर्ढावली असू शकते याचा प्रत्यय या घटनाक्रमावरून येतो.
तेरा किलोमीटर रस्त्याच्या डांबरीकरणात प्रचंड सावळागोंधळ झाल्याचे वृत्त नुकतेच सचिञ लोकमतने प्रकाशित केले.त्यामुळे एकच खळबळ उडाली दुसऱ्याच दिवशी संबंधित ठेकेदाराने रस्त्यावरील बातमीमधील फोटोत दिसणारे स्थळ शोधून तितक्याच भागात स्वमर्जीने दुरुस्ती सुरू केली. प्रत्येक्षात असे काम करण्याची नियमाबली असते पुलाच्या मुरमाड मातीवरील पसरविलेले तकलादू डांबरीकरण यंत्राच्या साहाय्याने जेमतेम ओरबाडून काढले. व त्यावर परत गिट्टी आणि त्यावर पुन्हा मुरमाड माती पसरून रोड रोलरच्या मदतीने बुजवून सपाटीकरण केले. प्रत्येक्षात डांबरीकरण उखडलेल्या ठिकाणी दुप्पट लांबीची जागा तयार करून त्यात गिट्टी भरून पुन्हा डांबरीकरण करणे क्रमप्राप्त होते.पण प्रत्येक्षात तसे कुठंच होतांना दिसून येत नाही या तेरा किलोमीटर वर उर्वरित पुलावरीलही डांबरीकरण जागोजागी दबले अथवा उखळले आहे. त्याकडे अद्याप तरी जाणीवपूर्वक दुर्लक्ष संबधीत ठेकेदाराने चालविल्याचे एकूण कारभारावरून दिसून येते. शासकीय बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपले साटेलोटेपूर्ण हितसंबंध बाजूला ठेऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जन्मभूमीला कर्मभूमिशी जोडणाऱ्या रस्त्याची जातीने लक्ष घालून दुरुस्ती करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.