शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

१३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 01:13 IST

राज्य शासनाच्या १३ कोटी वृक्षलागवड मोहिमेचा जिल्ह्यात पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते वटवृक्षाच्या रोपणाने रविवारी महादेवखोरी वनक्षेत्रात शुभारंभ झाला. मोहिमेदरम्यान जिल्ह्यात महिनाभर २६ लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट असून, शहरे, गावे, शाळा, कार्यालये, विविध संस्था यात सहभागी झाल्या आहेत.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण : लोकसहभागातून २६ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य शासनाच्या १३ कोटी वृक्षलागवड मोहिमेचा जिल्ह्यात पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते वटवृक्षाच्या रोपणाने रविवारी महादेवखोरी वनक्षेत्रात शुभारंभ झाला. मोहिमेदरम्यान जिल्ह्यात महिनाभर २६ लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट असून, शहरे, गावे, शाळा, कार्यालये, विविध संस्था यात सहभागी झाल्या आहेत.खासदार आनंदराव अडसूळ, विभागीय आयुक्त पीयुष सिंह, विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीकांत तरवडे, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, मुख्य उपवनसंरक्षक प्रवीण चव्हाण, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, उपवनसंरक्षक हेमंत मीना यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. महादेवखोरीतील टेकडीनजिक वनक्षेत्रात १ जुलै रोजी पहाटेपासूनच वृक्ष लागवडीसाठी विद्यार्थी, स्वयंसेवक, कार्यकर्ते, महिला संघटना, वनसंवर्धन संस्थांचे सदस्य आदी उत्साहाने दाखल झाले होते.निसर्ग संरक्षण संस्था, वाईल्डलाईफ अँड एन्व्हार्यनमेंट कन्झर्वेशन सोसायटी यासारख्या अनेक संस्थांचा सहभाग होता. पालकमंत्र्यांनी वटवृक्ष लावून मोहिमेचा शुभारंभ केला. विद्यार्थी, स्वयंसेवकांनी मोठ्या प्रमाणात बांबूची रोपटी लावली. त्यामुळे अमरावती शहराला भूषणावह असलेल्या बांबू गार्डनच्या मालिकेत नवे बांबू उद्यान महादेवखोरी टेकडीपायथ्याशी आकारास येणार आहे. यावेळी सामाजिक वनीकरण उपसंचालक प्रदीप मसराम, रोहयो उपजिल्हाधिकारी आर. डी. काळे, जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी माया वानखडे, निशिकांत काळे, जयंत वडतकर, वडाळीचे नवे आरएफओ कैलास भुंबर यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.वृक्ष लागवड मोहीम नियोजनमोहिमेत विविध विभागांसह ग्रामपंचायती, स्वयंसेवी संस्थांचा सहभाग मिळाला आहे. वन विभागाकडून ८ लाख ५० हजार, सामाजिक वनीकरणाकडून ५ लाख, ग्रामपंचायतींकडून ९ लाख ६हजार व विविध विभागांकडून ३ लाख ४४ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे. ४५ लाखांहून अधिक रोपे तयार आहेत. शेतीबांधांवर शेवगा, कढीपत्ता, औषधी वनस्पती आदी वृक्ष लागवड होणार आहे. ‘नरेगा’अंतर्गत मनुष्यबळही उपलब्ध करुन घेण्यात येत आहे. ‘जिओ टॅगिंग’मुळे प्रत्येक खड्ड्याची, झाडाची नोंद व तपासणी ठेवता येणे शक्य आहे. नदीच्या दोन्ही काठांपासून एक किलोमीटर रूंदीत उपलब्ध क्षेत्रात वृक्षलागवड होणार आहे.पर्यावरण संवर्धनाचे संस्कारमोहिमेत वृक्षलागवडीसह पालक व विद्यार्थ्यांच्या मोठ्या प्रमाणातील सहभागामुळे पर्यावरण संवर्धनाचा संस्कारही जोपासला जात आहे, असे पालकमंत्री पोटे यावेळी म्हणाले. निवृत्त वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी एस. झेड. काझी यांचा यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. 

टॅग्स :Pravin Poteप्रवीण पोटे