लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील शोभानगरात शुक्रवारी रात्री १०.३० च्या सुमारास क्षुल्लक कारणावरून मित्रानेच मित्राची चाकूने भोसकले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या युवकाला त्याच्या मित्रांच्या मदतीने इर्विन रुग्णालयात नेले. उपचारादरम्यान रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला.पोलीस सूत्रांनुसार, पंकज गोकुळ ूसिडाम (२८, रा. शोभानगर) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. धीरज विश्वासराव ठाकरे (२८, रा. शोभानगर) व सागर गजानन खरड (२२, रा. शोभानगर) अशी आरोपींची नावे आहेत. खूनप्रकरणातील आरोपी असलेला धीरज ठाकरे याने पंकजला शोभानगरातील पानटपरीवर बोलावले. त्या ठिकाणी दोघांमध्ये बाचाबाची झाली. तू फार मोठा झाला का, असे पंकजने धीरजला सुनावले. त्यामुळे वाद चिघळला आणि प्रकरण हातघाईवर आले. सागरशी संगतमत करून धीरजने पंकजला चाकूने भोसकले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पंकजला अन्य मित्रांनी तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. येथे उपचारादरम्यान तो दगाविल्याची माहिती पोलिसांनी दिली.घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके, सहायक आयुक्त सोहेल खान, गाडगेनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे, पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर रात्री उशिरा आरोपी धीरज ठाकरे व सागर खरड यांना वडाळी परिसरातून ताब्यात घेऊन अटक केली. त्यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ३०२, ३४ अन्वये नुसार गुन्हा नोंदविला. याप्रकरणी दहा जणांचे बयाण नोंदविण्यात आले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.आरोपी, मृतावरही गुन्हेक्षुल्लक कारणावरून पंकजची हत्या करण्यात आली. मात्र, यातील आरोपी धीरज ठाकरे याच्याविरुद्ध सात वर्षांपूर्वी भादंविचे कलम ३०२ खुनाचा गुन्हा दाखल होता, तर तीन वर्षांपूर्वी कलम ३२४ अन्वये गुन्हा दाखल असल्याची माहिती ठाणेदार मनीष ठाकरे यांनी दिली. मृत पंकज सिडाम याच्याविरुद्ध भादंविची कलम ३९२, ३२४ अन्वये गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.क्षुल्लक कारणावरून चाकूने भोसकून हत्या केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले. दोन आरोपींना रात्रीच अटक केली. एका आरोपीविरुद्ध यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल होता. आरोपीला न्यायालयात हजर केले जाणार आहे.- मनीष ठाकरेवरिष्ठ पोलीस निरीक्षक, गाडगेनगर
मित्राची चाकूने भोसकून हत्या; दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 05:00 IST
धीरज विश्वासराव ठाकरे (२८, रा. शोभानगर) व सागर गजानन खरड (२२, रा. शोभानगर) अशी आरोपींची नावे आहेत. खूनप्रकरणातील आरोपी असलेला धीरज ठाकरे याने पंकजला शोभानगरातील पानटपरीवर बोलावले. त्या ठिकाणी दोघांमध्ये बाचाबाची झाली. तू फार मोठा झाला का, असे पंकजने धीरजला सुनावले. त्यामुळे वाद चिघळला आणि प्रकरण हातघाईवर आले. सागरशी संगतमत करून धीरजने पंकजला चाकूने भोसकले.
मित्राची चाकूने भोसकून हत्या; दोघांना अटक
ठळक मुद्देशोभानगरातील घटना । गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला