शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

एसटी धावणार टोलनाक्याविना !

By admin | Updated: February 21, 2017 00:13 IST

कुठल्याही महत्त्वाच्या स्थळी ठराविक वेळेत पोहोचण्यासाठी बसमध्ये बसल्यानंतर किती वेळेत पोहोचणार याचा विचार मनात सुरू होतो.

लवकरच ई-टॅग प्रणाली : दर्शनी भागावर असेल विशिष्ट स्टीकर, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रयोगजितेंद्र दखने अमरावतीकुठल्याही महत्त्वाच्या स्थळी ठराविक वेळेत पोहोचण्यासाठी बसमध्ये बसल्यानंतर किती वेळेत पोहोचणार याचा विचार मनात सुरू होतो. पण टोलनाक्यावर एसटीला ब्रेक लागतो. काही वेळेस १५ ते २० मिनिटे सहज जातात. अन् चिडचिड सुरू होते. याला आता खो बसणार आहे. एसटीच्या नवीन ‘ई-टॅग’ प्रणालीमुळे टोलनाक्यावर कोणत्याही अडथळ्याविना एसटी धावू शकणार आहे.राज्य परिवहन महामंडळाच्या शेकडो गाड्या दररोज रस्त्यावर धावत असतात. त्यामुळे एसटीसाठी टोल फ्री करावा, अशी मागणी जोर धरू लागली होती. याला अद्याप यश आले नसले तरी एसटीला मासिक पास दिली जात होती. यामुळे दररोज पैसे द्यावे लागत नसले तरी वेळ मात्र जातच होता. हाच वेळ वाचविण्यासाठी एसटीने ई-टॅग ही आधुनिक प्रणाली अतित्वात आणली आहे. ई-टॅग प्रणाली राष्ट्रीय महामार्गावर धावणाऱ्या बसेससाठी उपलब्ध असणार आहे. यामध्ये एसटीच्या दर्शनी भागातील काचेवर विशिष्ट प्रकारचे स्टिकर चिकटवलेले असेल एसटी राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यावर गेल्यास आहे त्याच वेगात स्टिकर स्कॅन केले जाईल. त्यानंतर त्याची नोंद तेथील संगणकावर केली जाणार आहे. यासाठी बँकेमध्ये आगारनिहाय खाते उघडलेले असेल. या खात्यामध्ये दरमहिन्याला ठराविक रक्कम भरणा केली जाणार आहे. एसटीचे स्टिकर स्कॅन झाल्यावर गाडीच्या नंबरची नोंद होणार आहे. त्यामुळे त्याच क्षणी बँकेच्या खात्यातून ठरलेली रक्कम कापून घेतली जाणार आहे. याचा संदेश तत्काळ विभाग नियंत्रक, लेखाअधिकारी व आगार व्यवस्थापकांना जाणार आहे. टोलमध्ये दहा टक्के सवलतई-टॅग प्रणाली अतित्वात आल्यानंतर पथकराच्या रकमेत दहा टक्के सवलत दिली जाणार आहे. तसेच अन्य जिल्ह्यातून आलेले वाहन तांत्रिक कारणामुळे बंद पडल्यास त्या वाहनांना पर्यायी वाहन देण्याचे अधिकार संबंधित आगार व्यवस्थापकांना दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.राष्ट्रीय महामार्गावर स्वतंत्र लेनराष्ट्रीय महामार्गावर ई-टॅग लावलेल्या स्टिकरच्या वाहनांसाठी स्वतंत्र लेन असणार आहे. त्यामुळे रांगेत वाहने उभी करणे, एखादे छोटे वाहन मध्येच शिरल्यास होणारी वादावादी त्यातून मार्ग काढून टोलनाक्याच्या वसुली केंद्रात पोहोचल्यावर पैसे किंवा पास दाखविणे यासाठी लागणारा वेळ वाचणार आहे. मार्गावर धावणाऱ्या वाहनांची नोंदयासाठी एसटी महामंडळ कोणत्या मार्गावर कोणत्या गाड्या धावणार आहेत याचे नियोजन करून ते राष्ट्रीय महामार्ग विभागाला देणार आहेत. आपत्कालीन अडचण आल्यास पर्याय म्हणून अतिरिक्त वाहनांची यादी दिली जाणार आहे. त्यामुळे अडचणी येणार नाहीत.