हवमान तज्ज्ञांची माहिती : मान्सून पुन्हा होणार सक्रियअमरावती : जिल्ह्यात सोमवार ४ आॅगस्ट पासून कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. आतापर्यंत ५१७.३ मि.मी. पावसाची जिल्ह्यात नोंद करण्यात आली. हा पाऊ स अपेक्षित सरासरीच्या ३१ मि.मी.ने अधिक व गतवर्षीच्या तुलनेत ५९.४ मि.मी.ने अधिक आहे. सोमवार ९ आॅगस्टपर्यंत पावसाची रिमझिम कायम राहणार आहे. त्यानंतर १२ ते १४ आॅगस्ट दरम्यान मध्य भारतात पुन्हा मान्सून सक्रिय होण्याची शक्यता असल्याने पाऊस वाढणार असल्याची माहिती हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी दिली. पावसाळ्यामध्ये जुलै व आॅगस्ट महिन्यात बंगालच्या उपसागरात अनेक हवामान प्रणाली निर्माण होतात. ज्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. बंगालच्या उपसागरात दर महिन्यात चारवेळा वेगवेगळी हवामान स्थिती निर्माण होते. ही स्थिती तयार झाल्यावर मान्सूनचा पाऊस पडण्यासाठी अन्य अनुकूल घटक जसे चक्राकार वारे, द्रोणिय स्थिती आदी घटक अनुकूल असावे लागतात. मान्सूनच्या कमी दाबाचा पट्टा (द्रोणीय) हा महत्त्वाचा चालक घटक आहे. सध्या मान्सूनचा असाच पश्चिम भाग हा हिमालयाच्या पायथ्याशी व पूर्व भाग बंगालच्या उपसागराकडे झुकला आहे. त्यामुळे पावसाची स्थिती निर्माण झाली आहे.विदर्भात मध्यम पावसाची शक्यताअमरावती : सद्यस्थितीत एक अत्यंत शक्तीमान चक्रीवादळ ‘शोलेदर’ तायवानच्या किनाऱ्यावर धडकले आहे. दुसरी धडक चिनच्या किनारपट्टीवर होत आहे. हे वादळ जमिनीवर पोहोचल्यावरदेखील शक्तीशाली राहणार आहे. या वादळामागे आणखी एक वादळ आहे ते चीनकडे सरकत आहे. काही काळानंतर हे दोन्हीवादळे एकमेकात विलीन होतील. या अतिशक्तीशाली प्रणाली मान्सूनवर परिणाम करीत आहे. यामुळे बंगालच्या उपसागरावरील वाऱ्याचे वितरण प्रभावीत होते. प्रशांत महासागरातील हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे बंगालच्या उपसागरात ताबडतोब एखादी हवामान स्थिती निर्माण होत नाही. येत्या ४८ तासात ही वादळे थंड पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर एखादी मोठी स्थिती बंगालच्या उपसागरात निर्माण होईल व यामुळे पुढील आठवड्यात मध्य भारतात मान्सून पुन्हा सक्रिय होऊ शकतो तोपर्यंत विदर्भात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस १० आॅगस्टपर्यंत पडण्याची शक्यता आहे व १२ ते १४ आॅगस्टनंतर पाऊ स वाढण्याची शक्यता असल्याचे हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
सोमवारपर्यंत तुरळक; गुरुवारनंतर वाढणार पाऊस
By admin | Updated: August 9, 2015 23:57 IST