शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

अमरावती विद्यापीठात नव्या कुलगुरू निवड प्रक्रियेला वेग, ११ जुलै रोजी बैठक

By गणेश वासनिक | Updated: July 9, 2023 16:01 IST

विद्वत, व्यवस्थापन परिषदेची होणार बैठक; कुलगुरू निवड समितीत प्रतिनिधी नेमणार

गणेश वासनिक, अमरावती : संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठात नव्या कुलगुरूंच्या निवड प्रक्रियेला वेग आला असून विद्वत परिषद आणि व्यवस्थापन परिषदेची बैठक होणार आहे. या बैठकीत राष्ट्रीय स्तरावर संस्था संचालकाची कुलगुरू निवड समितीत प्रतिनिधी म्हणून निवड केली जाणार आहे. त्यानंतर हे नाव विद्यापीठ प्रशासन राज्यपालांकडे पाठविणार असल्याची माहिती आहे.

अमरावती विद्यापीठ प्रशासनाने नव्या कुलगुरू निवड प्रक्रियेच्या अनुषंगाने व्यवस्थापन परिषद आणि विद्वत परिषदेच्या सदस्यांनी ११ जुलै रोजीच्या बैठकीचा अजेंडा पाठविला आहे. यात कुलगुरू निवड समितीत प्रतिनिधी नेमले जाणार असल्याने राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक संस्था चालकांच्या नावावर मंथन अथवा प्रस्ताव सादर करून एक नाव निश्चित केले जाणार आहे. हे नाव राज्यपाल कार्यालयाकडे पाठविल्यानंतर राज्यपालांच्या निर्देशानुसार अमरावती विद्यापीठात नवव्या कुुलगुरूपदाच्या नियुक्तीकरिता समिती गठित केली जाणार आहे. या समितीत सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अथवा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती हे अध्यक्ष असतील, तर सचिवपदी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण प्रधान सचिव हे कामकाज पाहतील. तर या समितीत सदस्यपदी विद्यापीठाने निवड केलेला प्रतिनिधी असेल तर नोडल अधिकारी म्हणून आयआयटीचे संचालक हे असणार आहे.

टॅग्स :Amravatiअमरावतीuniversityविद्यापीठ