लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केंद्र सरकारच्या धोरणाप्रमाणे पुस्तकी ज्ञानार्जनासह रोजगार, प्रात्यक्षिकांवर भर देणारे अभ्यासक्रमाचा लाभ विद्यार्थ्यांना घेता यावा, यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात स्टार्टअप इंडिया अंतर्गत २१ व २२ एप्रिल रोजी अभियांत्रिकी, विज्ञान पदव्युत्तर विद्यार्थी मॉडेल सादर करणार आहेत. विद्यार्थ्यांना तज्ज्ञ शास्त्रज्ञांचे मार्गदर्शनदेखील मिळेल.अमरावती विद्यापीठ अंतर्गत अभियांत्रिकी, विज्ञान पदव्युत्तरचे विद्यार्थी स्टार्टअप इंडिया अंतर्गत मॉडेल सादर करणार आहे. प्रत्येक महाविद्यालयांतून दोन मॉडेल प्रात्यक्षिक सादर करण्याची मुभा दिली जाणार आहे. त्याअनुषंगाने विद्यापीठ प्रशासनाने महाविद्यालयांच्या प्राचार्यांसोबत पत्रव्यवहार चालविला आहे. बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रज्ञ वृत्ती जागृत करण्याच्या अनुषंगाने हा उपक्रम राबविला जात आहे. परंपरागत शिक्षणप्रणालीसोबत कोणत्या प्रकारचे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना रोजगार, नोकरीचा वाटा शोधून देतील, याकडे कुलगुरू चांदेकरांनी भर दिला आहे. दोन दिवसीय मॉडेल प्रदर्शनीतून विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रात्यक्षिकाद्वारे त्यांची वैज्ञानिक कल्पकता पुढे येणार आहे. अभियांत्रिकीच्या विविध शाखांचे विद्यार्थी कोणत्या प्रकाराचे मॉडेल तयार करतात, हादेखील औत्सुक्याचा विषय ठरणारा आहे. कार्यशाळेत मेकर्स स्पेस, फॅब लॅब अंतर्गतदेखील प्रशिक्षण देण्याबाबत विद्यापीठ प्रशासनाने तयारी चालविली आहे.विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक कल्पना शक्तीला पुढे आणण्यासाठी स्टार्टअप इंडिया अंतर्गत मॉडेल प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमातून विद्यार्थी बदलत्या काळानुसार प्रगतीकडे वाटचाल करेल, यात दुमत नाही.- मुरलीधर चांदेकर,कुलगुरू, अमरावती विद्यापीठ.
विद्यापीठात स्टार्टअप इंडियाला गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 23:25 IST
केंद्र सरकारच्या धोरणाप्रमाणे पुस्तकी ज्ञानार्जनासह रोजगार, प्रात्यक्षिकांवर भर देणारे अभ्यासक्रमाचा लाभ विद्यार्थ्यांना घेता यावा, यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात स्टार्टअप इंडिया अंतर्गत २१ व २२ एप्रिल रोजी अभियांत्रिकी, विज्ञान पदव्युत्तर विद्यार्थी मॉडेल सादर करणार आहेत. विद्यार्थ्यांना तज्ज्ञ शास्त्रज्ञांचे मार्गदर्शनदेखील मिळेल.
विद्यापीठात स्टार्टअप इंडियाला गती
ठळक मुद्दे२१, २२ एप्रिल रोजी कार्यशाळा : विद्यार्थी सादर करणार मॉडेल