शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

जप्त मालमत्तांच्या लिलाव प्रक्रियेला गती, जिल्हाधिका-यांचे सक्षम प्राधिका-यांना स्मरणपत्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 18:09 IST

आर्थिक फसवणूक प्रकरणांमध्ये जप्त केलेल्या मालमत्तेच्या लिलावास विलंब होत असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जिल्हाधिका-यांना पत्राद्वारे निदर्शनास आणून दिले होते.

अमरावती, दि. 13 - आर्थिक फसवणूक प्रकरणांमध्ये जप्त केलेल्या मालमत्तेच्या लिलावास विलंब होत असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जिल्हाधिका-यांना पत्राद्वारे निदर्शनास आणून दिले होते. त्याअनुषंगाने जिल्हाधिका-यांमार्फत प्राप्त पत्राची सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्त उपविभागीय अधिका-यांंनी दखल घेत लिलाव प्रक्रियेला गती दिली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे लवकरच परत मिळाण्याची आशा पल्लवीत झाली आहे. श्रीसूर्या, राणा लॅन्डमार्क, सात्विक व मैत्रेय या चारही कंपन्यांच्या संचालकांविरूद्ध ‘एमपीआयडी’ कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे. या कंपन्यांनी गुंतवणूकदारांची तब्बल ११८ कोटी १३ लाखांनी फसवणूक केल्याच्या तक्रारी आर्थिक गुन्हे शाखेला मिळाल्या होत्या. चौकशीनंतर पोलिसांनी चारही कंपन्यांची विविध राज्यांतील सुमारे १५० कोटींची मालमत्ता उघड केली. यामध्ये श्रीसूर्या, राणा लॅन्डमार्क व सात्विकच्या फसवणूक प्रकरणात शासनाने सक्षम प्राधिका-यांची नियुक्ती केली आहे. सक्षम प्राधिकारी या उघड मालमत्तेचा लिलाव करून गुंतवणूकदारांना पैसे परत करणार आहे.

श्रीसूर्याकडून ६० कोटींची फसवणूकश्रीसूर्या कंपनीने गुंतवणूकदारांची तब्बल ६० कोटींनी फसवणूक केली आहे. या प्रकरणात राजापेठ पोलिसांनी समीर जोशीसह १४ जणांविरूद्ध गुन्हे नोंदवून त्यांची ७ कोटी ९७ लाख ९७ हजार ३३९ रूपयांची मालमत्ता उघड केली आहे. यामध्ये १६ आॅगस्ट २०१४ रोजी सक्षम प्राधिकारी नियुक्ती करण्यात आले असून तशी अधिसूचना २४ फेब्रुवारी २०१५ रोजी निघाली आहे. 

‘राणा लॅण्डमार्क’द्वारे १३ कोटींचा चुनाराणा लॅण्डमार्कने गुंतवणूकदारांची १३ कोटींनी फसवणूक केली आहे. कोतवाली पोलिसांनी योगेश नारायण राणा, चंद्रशेखर राणा, शशीकांत जिचकार, अभय शिरभाते, अभिजित लोखंडेविरूद्ध गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनी त्यांची १७ कोटी ८५ लाख ८५ हजार ९०० रूपयांची मालमत्ता उघड केली आहे. सक्षम प्राधिकारी नियुक्त असून २५ एप्रिल २०१६ रोजी अधिसूचना निघाली आहे. 

सात्विकद्वारे १३ लाखांचा गंडासात्विकने गुंतवणूकदारांची १४ लाखांनी फसवणूक केली आहे. गाडगेनगर पोलिसांनी अमोल ढोकेविरूद्ध गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनी त्यांची १६ लाख ८५ हजार २५० रूपयांची मालमत्ता उघड केली आहे. यामध्ये १० फेब्रुवारी २०१६ रोजी सक्षम प्राधिकारी नियुक्त झाले आहेत. १० आॅगस्ट २०१६ रोजी अधिसूचना निघाली आहे. 

मैत्रेयने केली ३५ कोटींनी फसवणूकमैत्रेय कंपनीने ग्राहकांची ३५ कोटींनी फसवणूक केली. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी जनार्दन परुळेकरसह सहा आरोपींविरूद्ध गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनी त्यांची १२५ कोटी ७४ लाख ३४ हजार ६८७ रूपयांची मालमत्ता उघड केली आहे. याबाबत सक्षम प्राधिका-यांची नियुक्ती अद्याप झाली नाही. 

आर्थिक फसवणूकप्रकरणी पोलिसांनी जप्त केलेल्या स्थावर व जंगम मालमत्तेच्या लिलाव प्रक्रियेचे कामकाज सुरू आहे. यासंबंधित दस्तऐवज दिवाणी न्यायालयात दाखल केले आहे. त्यांच्या निर्णयानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. - इब्राहिम चौधरी, सक्षम प्राधिकारी (उपविभागीय अधिकारी)

टॅग्स :Policeपोलिस